Ganpath Teaser Shared On Social Media Instagram
मनोरंजन बातम्या

Ganpath Teaser: २०७० साली काय घडणार? टायगर -क्रिती - अमिताभच्या ‘गणपत’ ॲक्शनपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

Tiger Shroff And Kriti Senon New Film: बॉलिवूडचा ॲक्शन हिरो टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या ‘गणपत’ या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

Chetan Bodke

Ganpath Teaser Shared On Social Media

बॉलिवूडचा ॲक्शन हिरो टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या (Kriti Sanon) ‘गणपत’ (Ganapath) या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. चित्रपटामध्ये टायगरसोबत क्रितीही दमदार ॲक्शन करताना दिसणार आहे.

चित्रपटाची कथा २०७० ची दिसून येत आहे. टीझरच्या सुरुवातीला टायगर श्रॉफ ध्यानधारणेला बसलेला दिसून येत आहे. काही गुंड त्याला मारायला येतात. ते येताच तो त्यांच्यासोबत दोन हात करताना, दिसून येत आहे. एक दमदार टेक्नोलॉजीने उपयुक्त असं शहर आपल्याला पाहायला मिळत आहे. ॲक्शन अंदाजातील या चित्रपटामधील सर्वच कलाकारांची प्रचंड चर्चा होत आहे. टायगर श्रॉफ, क्रिती सेनन, अमिताभ बच्चन हे तिघेही चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहे. सध्या या टीझरची प्रचंड चर्चा होत आहे.

टीझरमधील ही अनोखी सफर प्रेक्षकांना फारच भावली आहे. टेक्नोलॉजिने उपयुक्त या शहराचं दर्शन प्रेक्षकांना चित्रपटातून आणखी कशाप्रकारे घडणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. ॲक्शन- थ्रिलर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत्या २० ऑक्टोबरला येणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला दसऱ्याच्या मुहूर्तावर येणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केली असून चित्रपटाची निर्मिती विकास, वाशु भगनानी, दीप्शिका देशमुख आणि जॅकी भगनानी या चौघांनी मिळून चित्रपटाची निर्मिती केली आहे. टायगर आणि क्रितीने ‘हिरोपंती’मध्ये एकत्र काम केलं होतं. आता त्यानंतर ही जोडी पुन्हा एकदा ‘गणपत’मध्ये एकत्र दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT