Gautami Patil Nashik: गौतमी पाटीलचा शाळेच्या मैदानात डान्स; गावकऱ्यांनी आनंद लुटला, मात्र आयोजकांचं टेन्शन वाढलं

Gatami Patil News: नाशिकमध्ये पुन्हा एकदा गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Gautami Patil Nashik Dance Show
Gautami Patil Nashik Dance Show Saam tv
Published On

तबरेज शेख

GauTami Patil Dance Show At School Ground:

गौतमी पाटील आणि तिचा कार्यक्रम नेहमीच वादाचा मुद्दा असतो. नाशिकमध्ये पुन्हा एकदा गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमीचा डान्स चक्क एका शाळेच्या पटांगणात आयोजित केला गेला होता. आता शाळा देखील गौतमी पाटीलच्या डान्ससाठी बुक होणार का असा प्रश्न केला जात आहे?

गौतमी पाटीलचा कार्यक्रम तिसऱ्यांदा नाशिकच्या आयोजित करण्यात आला होता. मात्र यावेळी जिथे गौतमी डान्स करत होती ते मैदान जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच होतं.

Gautami Patil Nashik Dance Show
Rahul Dholakia Post: ‘पाकिस्तानी क्रिकेटर्सनंतर कलाकारंनाही भारतात येण्यासाठी आमंत्रण देऊया?’ ‘रईस’ दिग्दर्शक राहुल ढोलकियाने व्यक्त केली इच्छा

दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर स्टेज तयार करण्यात आलं होतं. प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीला पाठ करून ध्वजारोहणाच्या ठीकाणी ही तयारी करण्यात आली होती.

दिवसा चालणाऱ्या या शाळेत संध्याकाळी मात्र डीजेचे मोठमोठे स्पीकर्स लावून प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने तिच्या डान्सने परिसरातील तरुणांना वेड लावलं. विशेष म्हणजे हा कार्यक्रम परिसरातील सर्व गावांसाठी मोफत आयोजित करण्यात आला होता. विविध मद्याच्या ब्रँडसाठी प्रसिद्ध असलेली सीग्राम कंपनीने ही शाळा दत्तक घेतली आहे.

गौतमीचा महाराष्ट्रातील प्रत्येक नाच-गाण्याचा कार्यक्रम हा नेहमीच वादग्रस्त ठरतो. कधी तरुणांची दांडगाई, मारामाऱ्या तर कुठे गोंधळामुळे नेहमी चर्चेत असतो. नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि नाशिक शहरात झालेल्या दोन्ही कार्यक्रम गोंधळ झाला. तसेच पत्रकारांना झालेल्या मारहाणीमुळे हा कार्यक्रम चांगल्याच चर्चेत आला होता.

तर आता नाशिकमध्ये गौतमीच्या तिसऱ्या कार्यक्रमाच आयोजन चक्क विद्येच्या दारात केल्याने ते शांततेत झालं, ही या कार्यक्रमाची जमेची बाजू. गौतमी पाटीलने आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. (Latest Entertainment News)

गौतमी पाटीलने जरी या कार्यक्रमच्या आयोजनाविषयी समाधान व्यक्त केलं असलं तरी आयोजकांचं टेन्शन वाढणार आहे. कारण शाळेच्या पटांगणात गौतमीचा क्रार्यक्रमात आयोजित केल्याने आयोजकांवर कारवाई होऊ शकते.

Gautami Patil Nashik Dance Show
Fukrey 3 Box Office Collection: चुचा, हनी आणि भोली पंजाबनने गाजवले बॉक्स ऑफिस; 'द वॅक्सीन वॉर'ला मागे टाकत 'Fukrey 3'ची दमदार सुरुवात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com