sushant singh rajput case  saam tv
मनोरंजन बातम्या

सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला अखेर जामीन मंजूर

सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील आरोपी सिद्धार्थ पिठानीला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर करण्यात आला आहे. सिद्धार्थ पिठानीला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सूरज सावंत

मुंबई : सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील आरोपी सिद्धार्थ पिठानीला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर करण्यात आला आहे. सिद्धार्थ पिठानीला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठाने पिठानीला ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. (sushant singh rajput case news In Marathi )

सिद्धार्थ पिठानीला हैदराबादमधून २०२१ मध्ये केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने अटक केली होती. याप्रकरणी अभिनेत्री आणि सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविकलाही अटक करण्यात आली होती. सिद्धार्थ पिठाणी हा सुशांत सिंगसोबत त्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. दरम्यान, अभिनेता सुशांत सिंग राजपूतने जून २०२० साली आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर अमलीपदार्थ प्रकरणाशी निगडीत असल्याने पिठानीला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती देखील आरोपी होती. मात्र, रिया सध्या जामीन मिळाल्याने तुरुंगाच्या बाहेर आहे.

तसेत पिठानीने त्याला अमलीपदार्थ प्रकरणात अडकवल्याचा आरोप करत जामीनीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांनी याचिकेत दावा केला होता की, त्याच्याजवळ कोणतेही अमलीपदार्थ आढळून आले नाही. त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाने पिठानीला जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली होती. त्यानंतर एनसीबीने तपासणी केल्यानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांमध्ये असलेलं अमलीपदार्थ तस्करीचं जाळं उघडकीस आलं होतं. त्यानंतर एनसीबीने रिया चक्रवर्तीसहित अन्य लोकांना अटक केली होती. यातील अनेकजणांना जामीन मंजूर झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात भरधाव दुचाकीला धडक देऊन एसटी बस शेतात शिरली; २५ प्रवासी किरकोळ जखमी

Vaidehi Parshurami: समुद्रकिनारी खुललं अभिनेत्रीचं सौदर्यं; वैदेही परशुरामीचा शिमरी गाऊनमध्ये ग्लॅमरल लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT