अभिनेता सोनू सुद हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे. कोरोना काळात अनेक गरजुंना मदत केली आणि रातोरात प्रसिद्ध झाला. कायमच आपल्या अभिनयामुळे प्रकाशझोतात राहिलेल्या सोनूची त्याच्या चाहत्यांना मदत करण्याची शैली फार आवडली. कोरोना काळापासून सोनूला 'मसीहा' नावानेच प्रसिद्धी मिळाली आहे. सोनू सूदचा आज (३० जुलै) वाढदिवस आहे. अभिनेता आज आपला ५१ वा वाढदिवस साजरी करतोय. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया काही खास गोष्टी...
सोनू सूदचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आहे. त्याच्या वडिलांचं कपड्यांचं दुकान होतं. दुकानातून येणाऱ्या पैशातूनच सूद कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होत होता. एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणेच सोनूच्याही घरातील वातावरण होतं. सोनू सूदच्या वडिलांनी त्याला इंजिनियरिंगचे शिक्षण घेण्यासाठी नागपूरला पाठवले. कॉलेजच्या दिवसांमध्ये सोनू एकाच खोलीत १२ मुलांसोबत राहायचा. इतरत्र मुलांप्रमाणे आपल्याही मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं, असं त्याच्या वडिलांना वाटायचं.
पण पैशांच्या आभावामुळे अनेकदा त्याला पैसे कमी मिळायचे. सोनूचे वडील सोनूला प्रत्येक महिन्याला खर्चासाठी पैसे पाठवयाचे. त्यातूनही अभिनेता पैसे वाचवण्याचा प्रयत्न करायचा. अभिनेत्याने इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं असलं तरीही त्याने त्या क्षेत्रात आपलं करियर केलं नाही. इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्याने मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवले. मॉडेलिंग क्षेत्रात करियर करण्यासाठी अभिनेता मुंबईत आला होता. मुंबईत आल्यानंतर सोनूच्या खिशात ५००० रुपये होते.
१९९९ मध्ये रिलीज झालेल्या 'कल्लाझागर' चित्रपटातून सोनूने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर सोनूने अनेक टॉलिवूड चित्रपटांत काम केले. २००२ मध्ये सोनूने 'शहीद- ए- आझम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. त्याने आपल्या फिल्मी करियरमध्ये 'कहां हो तुम', 'मिशन मुंबई', 'युवा', 'आशिक बनाया आपने' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. सोनूने बॉलिवूडसोबतच तेलुगू, तामिळ आणि कन्नड इंडस्ट्रीमध्ये काम केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.