नुकतंच बॉक्स ऑफिसवर सिद्धार्थ जाधवचा ‘लग्न कल्लोळ’ चित्रपट रिलीज झाला आहे. सध्या ह्या चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. मिश्किल पद्धतीने लग्नसंस्थेवर भाष्य करणाऱ्या ह्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री मयुरी देशमुखने ‘लग्न कल्लोळ’च्या प्रमोशननिमित्त कोपरगावमध्ये हजेरी लावली होती. यावेळी सिद्धार्थचा भव्य कटआऊट उभारण्यात आला होता. चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून सिद्धार्थ भारावून गेला आहे. नुकतंच सिद्धार्थने सोशल मीडियावर एक हटके पोस्ट लिहिली आहे. (Marathi film)
सिद्धार्थ जाधव आपल्या पोस्टमध्ये म्हणतो,
“जाम भारी फिलिंग !!! ‘लग्न कल्लोळ’च्या निमित्ताने जे प्रेम मिळतंय त्यावर खरच विश्वास बसत नाहीये. आज कोपरगाव मध्ये ‘लग्न कल्लोळ’चा प्रिमियर होता आणि थिएटरच्या बाहेर माझा २५ फुटाचा भला मोठा कटआऊट उभारण्यात आला होता. त्यावर दुधाचा अभिषेक करण्यात आला.. (ते दूध प्रतिकात्मक होतं.. दूध वाया जाऊ नये म्हणुन ते दूध ५०० विद्यार्थ्यांना वाटण्यात आलं...)” (Marathi Actors)
“माझ्या २४ वर्षाच्या या छोट्याश्या कारकीर्दीत हे पहिल्यांदाच घडतंय... बापरे काय कमाल वाटत होतं... संपुर्ण टीमचे मनापासून आभार... मराठी कलाकार म्हणून मायबाप रसिकांचा जो आशिर्वाद मिळतोय तो खरच स्वप्नवत आहे. आणि ‘लग्न कल्लोळ’ला मिळणारा प्रतिसाद खुप भारी आहे... हा अभिषेक म्हणजे तुमच्यातल्याच एका सर्वसामान्यावर तुम्हीच तुमच्या प्रेमाचा केलेला वर्षाव आहे. खूप प्रेम, असंच प्रेम असुदे!!! तुमचा सिद्धार्थ जाधव...”
असं अभिनेता आपल्या पोस्टमध्ये म्हणतो. (Maharashtra News)
या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. एक नवरी आणि दोन नवरे असतात. चित्रपटात नेमका ‘लग्न कल्लोळ’ काय होणार?, मयुरी नेमकं कोणाच्या गळ्यात वरमाळा घालणारा ? हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. (Social Media)
चित्रपटात प्रमुख भूमिकेत सिद्धार्थ जाधव, मयुरी देशमुख, भूषण प्रधान, विद्या करंजीकर, प्रिया बेर्डे, प्रतीक्षा लोणकर, सुप्रिया कर्णिक, अमिता कुलकर्णी, भारत गणेशपुरे अशी तगडी स्टारकास्ट आहे. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.