Shreyas Talpade And Radhika Kumarswami New Movie Instagram
मनोरंजन बातम्या

Shreyas Talpade New Movie Announcement: श्रेयस तळपदेने केली आगामी ब्लॉकबस्टर चित्रपटाची घोषणा, ‘अजाग्रत’मध्ये अभिनेत्यासोबत दिसणार माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी

Shreyas Talpade News: दिवाळीच्या शुभमुहूर्तावर श्रेयस तळपदेने त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे.

Chetan Bodke

Shreyas Talpade And Radhika Kumarswami New Movie

आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकेमुळे चर्चेत राहणारा अभिनेता श्रेयस तळपदे कायमच चर्चेत राहतो. फक्त मराठी सिनेसृष्टीतच नाही तर, बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्येही त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

'पुष्पा' या सुपर- डुपरहिट चित्रपटामध्ये अल्लू अर्जूनला हिंदी आवाज दिल्यानंतर श्रेयसने टॉलिवूडमध्ये स्वतःचे नाव कमावलं. नुकतंच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर श्रेयस तळपदेने त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. ‘अजाग्रत’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Tollywood)

‘अंधारामागील सावल्या’ अशा आशयाची टॅगलाईन देत चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत कन्नड अभिनेत्री राधिका कुमारस्वामी सह सुनील, राव रमेश, जगपती बाबू, आदिथ्य मेनन, देवराज, अच्युत कुमार, साई कुमार, समुद्र कानी, मोहन लाल यांच्यासह अन्य कलाकार दिसणार आहेत. (Bollywood Film)

चित्रपटाच्या कथेमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी सेटची रचना अतिशय बारकाईने केली आहे. शुटिंग स्पॉट अधिकच नैसर्गिक वाटावे, यासाठी दिग्दर्शक शशिधर यांनी विशेष मेहनत घेतली आहे. चित्रपटाच्या माध्यमातून शशिधर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. (Actor)

रवी राज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट पॅन इंडिया नेण्याचा मानस आहे. राधिका कुमारस्वामी यांच्या व्यक्तिरेखेचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर रिलीज झालेला आहे. चित्रपट एकाचवेळी हिंदीसह सात विविध भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

राधिका कुमारस्वामी या माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या पत्नी आहेत. त्यांनी ३ फेब्रुवारी २००६ ते ८ ऑक्टोबर २००७ या काळामध्ये कुमारस्वामी यांनी कर्नाटक राज्याचे १८वे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. कुमारस्वामी हे कानडी सिनेसृष्टीमध्ये प्रसिद्ध निर्माते आणि वितरक आहे. (Actress)

हा चित्रपट श्रेयस तळपदेसाठी खास असणार आहे. सात वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणारा त्याचा हा पहिला पॅन इंडिया चित्रपट असणारा आहे. आकर्षक कथानक, कलाकार आणि दूरदर्शी दिग्दर्शनासह 'अजाग्रत' भारतीय चित्रपटसृष्टीत नवीन बेंचमार्क सेट करण्यासाठी सज्ज आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT