Shakti Kapoor Saam tv
मनोरंजन बातम्या

Shakti Kapoor: 'मी जिवंत आहे...'; निधनाची खोटी बातमी पसरवल्याने प्रसिद्ध अभिनेते संतापले

Shakti Kapoor: प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यांनी स्वतः पुढे येत संताप व्यक्त करत चाहत्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

Shruti Vilas Kadam

Shakti Kapoor: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि ‘क्राईम मास्टर गोगो’ या भूमिकेमुळे घराघरात प्रसिद्ध असलेले शक्ती कपूर यांच्या निधनाची खोटी बातमी शुक्रवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. या अफवेमुळे चाहत्यांमध्ये, मित्रपरिवारात आणि चित्रपटसृष्टीत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, काही तासांतच स्वतः शक्ती कपूर यांनी व्हिडिओद्वारे समोर येत आपण पूर्णपणे सुखरूप असल्याचे सांगितले आणि अफवा पसरवणाऱ्यांवर संताप व्यक्त केला.

७३ वर्षीय शक्ती कपूर यांच्या निधनाची पोस्ट अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. काही चाहत्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे कपूर कुटुंबीयांनाही मानसिक त्रास सहन करावा लागला.

ही बाब गंभीर होताच शक्ती कपूर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “माझ्या निधनाबाबत पसरलेली बातमी पूर्णपणे खोटी आहे. मी निरोगी आणि आनंदी आहे. कृपया अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.”

यावेळी त्यांनी खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर जोरदार नाराजी व्यक्त केली. “एखाद्याच्या मृत्यूबाबत विनोद करणे किंवा खोटी बातमी पसरवणे ही अत्यंत चुकीची आणि संवेदनशील बाब आहे. यामुळे त्या व्यक्तीबरोबरच त्यांच्या कुटुंबालाही मानसिक त्रास होतो,” असे ते म्हणाले.

शक्ती कपूर यांनी सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन करत, ही अफवा कोणी पसरवली याचा शोध घेणार असल्याचेही सांगितले. तसेच संबंधितांविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांबाबत यापूर्वीही अशा प्रकारच्या ‘डेथ होक्स’च्या घटना घडल्या आहेत. मात्र, शक्ती कपूर यांनी घेतलेली आक्रमक भूमिका सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवणाऱ्यांसाठी मोठा इशारा मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्य सरकारने माहितीच्या अधिकारात बदल

ठाकरेसेनेचा व्हीप फुटीर खासदारांनी झुगारला, बंडखोर खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?

या 5 चुकांमुळे चेहऱ्यावर येतात पिंपल्स

Friday Horoscope: अनोळखी लोकांवर लगेच विश्वास ठेवणं टाळा; वाचा आजचं राशीभविष्य

Famous Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचं ३६ व्या वर्षी निधन; पोटाच्या कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT