Suhana Khan Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Suhana Khan News: ‘बापाप्रमाणेच लेकही मोठी दिलदार...’; शाहरुख खानच्या मुलीचं ‘या’ कारणामुळे होतंय कौतुक

Suhana Khan: सध्या सोशल मीडियावर किंग खानच्या लेकीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओतून अभिनेत्री ट्रोल नाही तर, तिचे कौतुक होत आहे.

Chetan Bodke

Suhana Khan Viral Video: बॉलिवूडच्या किंग खानचा चित्रपट येत्या ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. शाहरूख कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत राहतो. गेल्या काही दिवसांपूर्वी शाहरूख आणि त्याची लेक सुहाना खान एकाच चित्रपटातून दिसणार आहे.

सुहाना तिच्या वडीलांच्या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. कायमच ती चाहत्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाकरिता चर्चेत असते. सुहानाचा सोशल मीडियावर चाहता वर्ग फार मोठ्या प्रमाणावर आहे.

सुहानाचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर किंग खानच्या लेकीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओतून अभिनेत्री ट्रोल नाही तर, तिचे कौतुक होत आहे.

मध्यंतरी तिने आपल्या आईसोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कार्यक्रमातून घरी परतत असताना तिच्या कारजवळ एक गरजू महिला येते, तिने तिच्याकडे मदत मागताच क्षणी, कोणत्याही क्षणाचा विलंब न करता तिने पर्समधून पैसे काढून दिले. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ पाहून तिच्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.

तिच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, ‘किती छान काम केलंय, अगदी वडिलांच्याच पाऊलावर पाऊल ठेवलाय…’, तर आणखी एक म्हणतो, ‘शेवटी वडिलांचे संस्कार…’, सोशल मीडियावर युजर्सने कमेंटच्या माध्यमातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चिज’च्या माध्यमातून ती ओटीटी विश्वात डेब्यू करणार आहे. तिच्यासोबत वडील किंग खान देखील चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून तिचा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सुहानाने अनेकदा सोशल मीडियावरून चित्रपटाबद्दलची माहिती शेअर केली होती. सोबतच आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, सुहाना ‘द आर्चिज’नंतर करण जोहर याच्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसण्याची शक्यत आहे.

करण जोहर दिग्दर्शित चित्रपटात चाहते सुहानाला पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्या चित्रपटाची कथा कोणत्याही चित्रपटाचा सिक्वेल किंवा रिमेक नसून नव्या कथेवर आधारलेला चित्रपट असणार आहे. सध्या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू असून अद्याप शूटिंगला सुरूवात झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile: मोबाईल चोरील गेल्यास 'तो' पुन्हा मिळवता येतो, त्वरित करा 'या' गोष्टी

Crime: कौटुंबिक वाद टोकाला भिडला; रागच्या भरात पत्नीचा गळा आवळला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग; Video

ओबीसी मेळाव्यातून पंकजा मुंडे टार्गेट? गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडेंना देण्याची भाषा

Voter List Scam: मतदारयांद्यामधील घोळावरुन विरोधक बरसले, निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा

SCROLL FOR NEXT