Kshitij Patwardhan Post: सुष्मिताची 'ताली' वेबसीरीजचं कागदावरुन पडद्यावर येण्यासाठी खुप संकटं, लेखक क्षितीज पटवर्धनचा खुलासा

Taali Making : 'ताली' या वेबसीरीजचे लेखन, लेखक क्षितिज पटवर्धन यांनी केले आहे.
Kshitij Patwardhan
Kshitij Patwardhan Saam TV
Published On

Kshitij Patwardhan Share Struggle During Taali: सुष्मिता सेन अभिनीत आणि रवी जाधव दिग्दर्शित 'ताली' या वेबसीरीजची खूप चर्चा आहे. या वेबसीरीजच्या माध्यमातून ट्रान्सजेन्डर कार्यकर्त्या श्री. गौरी सावंत यांच्या जीवनातील संघर्ष दाखविण्यात आला आहे.

'ताली' या वेबसीरीजचे लेखन, लेखक क्षितिज पटवर्धन यांनी केले आहे. क्षितिज पटवर्धन यांनी या वेबसीरीज दरम्यान आलेला अनुभव शेअर केला आहे.

Kshitij Patwardhan
Pune Crime: सोशल मीडियाच्या माध्यमातून अंमली पदार्थांची विक्री; सिंहगड पोलिसांकडून दोघांना अटक

क्षितिज पटवर्धन लेखन म्हणून त्यांचा या वेबसीरीजमधील प्रवास मांडला आहे. त्यांनी म्हटले आहे की, '२०१४-१५ ला पुणं सुटलं. कट्टे सुटले, गप्पा सुटल्या, मुंबईत असं चालतं याच्या ऐकीव चर्चा सुटल्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी अनेक लोकांच्या माझ्याबद्दलच्या समजातून, ग्रहातून सुटलो. (Latest Entertainment News)

एक म्हणजे मुंबईत अजून वेगवेगळ्या लोकांसोबत काम करायची तीव्र इच्छा होती, आणि दुसरं पुण्यात सुखवस्तू, गोड आणि एकाच प्रकारच्या गोष्टी करून कंटाळलो होतो. मुंबईतली ही पुढची वर्ष आपल्याला आव्हान देणाऱ्या कथा शोधण्यात गेली. त्यात काही फसली, काही वर्क झाली.

२०१९ च्या सुरुवातीला असंच हे आव्हान आलं, गौरी सावंत यांच्या आयुष्यावर मराठी सिनेमा काढायचं. आजवर तृतीयपंथी समाजाला आपल्या सिनेमात बीभत्स, नकारात्मक किंवा विनोदी याच पठडीत सादर केलं गेलंय. मला वाटलं ही ते मोडायची खूप चांगली संधी आहे, कारण ही एका मुलाची गोष्ट आहे ज्याला आई व्हायचंय! ही एका आईची गोष्ट आहे, जी तृतीयपंथी आहे.

Kshitij Patwardhan
Salman Khan's Special Post For Sunny Deol: ‘ढाई किलोचा हात अन् चाळीस कोटींची कमाई...’ भाईजानने केली सनी देओलसाठी खास पोस्ट; अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

निर्माती अफीफा नाडियादवाला हिने जबरदस्त पाठपुरावा करून हे मार्गी लावलं, आणि मी आणि समीर मिळून धुरळानंतर ही गोष्ट मराठी करणार अशी अनाउन्समेंट सुद्धा झाली. गौरीला भेटलो आणि तिच्या एकेक कहाण्या ऐकून कधी रडलो, कधी थक्क झालो, कधी घाबरलो सुद्धा.

ज्या गोष्टीचा आपण विचारही करू शकत नाही ती गोष्ट ती जगलीये, आणि आपल्याला त्या बद्दल लिहायचंय हे खूप मोठं आव्हान होतं. अख्खा मराठी सिनेमा लिहिला, त्याचं प्रेसेंटेशन तयार केलं, खूप लोकांना पाठवलं, अभिनेत्यांची नावं काढली, पुढचे ६ महिने उत्तराची फक्त वाट पाहिली, मग पहिला धक्का बसला... Lockdown नावाचा....'

क्षितिज यांनी दुसरी पोस्ट करत त्यांचा संघर्ष पुढे नेत लिहिले आहे की, 'मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लागला. हातात असलेले सहाही प्रोजेक्ट थांबले, एकाचा तर सेट बनलेला डिसमेंटल करायची वेळ आली. मग लोकांच्या स्क्रिप्ट वाचून त्याची फीज घेऊन फीडबॅक फर्स्ट नावाची ऍक्टिव्हिटी सुरु केली.

त्यातून थोडं का होईना काम चालू राहिलं. हातात बनलेल्या बाउंड स्क्रिप्ट्स होत्या, पण करायला कुणीही तयार नव्हतं. कारण त्यांनाही माहीत नव्हतं हे कधी थांबणार आहे. गौरी सावंत यांच्यावरचा सिनेमा बनणार नाही हे जवळपास निश्चित झालं, आणि सिरीज करूयात असं ठरलं. मग पुन्हा स्क्रिप्ट तोडली, कथानक विस्कटलं आणि नव्याने एपिसोडमध्ये जोडणी सुरू केली.

सौरभ चांदेकर या गुणी मित्राने मोजक्या पैशात अप्रतिम बायबल करून दिलं. दोन महिने केलेलं काम बघून तेव्हाचे सह निर्माते संजय मेहता यांनी स्वतःहून काही पैसे दिले. मग ही सीरीज हिंदीत करूया असं ठरलं.

मग फोन, मेल्स, पाठपुरावा, "प्लिज बघा", "एकदा वाचा" इथून प्रवास सुरु झाला, कुठल्याही प्लॅटफॉर्मला तीनच प्रश्न होते, "मोठा स्टार आहे का? मोठा डायरेक्टर आहे का? किंवा मोठा निर्माता आहे का?" आमच्याकडे तिन्ही नव्हतं. त्यामुळे आम्हाला कुठेही स्थान नव्हतं. या सगळ्यात समीर त्याच्या हिंदी सिनेमात बिझी झाला आणि संजय सरांना सुद्धा वाटलं की हे नाही होणार. त्यांनाही माघार घ्यावी लागली.

२०२० च्या शेवटी हातात खपून केलेलं बायबल, नव्याने लिहिलेले हिंदी सहा एपिसोड्स आणि असंख्य नकार पचवून आम्ही एकमेकांना पुन्हा धीर दिला की कधीतरी हे होईल, कारण आम्हाला गोष्टीवर आणि गौरीवर विश्वास होता.

या सगळ्यात एडविन डिसोझा हे माझे सेतूमधले सिनियर फार भक्कमपणे पाठीशी उभे राहिले, इंग्लिश त्यांनी सुधारलं, बायबल अप्रतिम इंग्रजीत लिहून दिलं आणि माझे सहाय्यक म्हणून रुजू झाले. पुढे त्यांनी अंजुम राजाबाली यांचा पटकथेचा कोर्स केला आणि आता ते माझ्या अनेक स्क्रिप्टसला सहाय्यक म्हणून काम करतात.

अर्ध २०१९, पूर्ण २०२० हे फक्त नकारात गेलं, नटांकडून, स्टुडिओकडून, दिग्दर्शकांकडून, प्लॅटफॉर्म कडून! आम्ही आपापल्या मार्गाने आमचा "पहिला बिलिव्हर" शोधत होतो, फक्त एक माणूस हवा होता जो म्हणेल की मी करतो!'

गौरी सावंत यांचा संघर्ष प्रेक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी क्षितिज पटवर्धन यांनी स्वतः किती संघर्ष केला हे त्यांनी सांगितलं आहे. लेखकाने कथा लिहिली के सगळं झालं असं होत नाही. ती कथा प्रेकक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी खूप मेहेत असत हे क्षितिज यांच्या पोस्टवरून लक्षात येते.

क्षितिज पटवर्धन पुढे देखील त्यांचा संघर्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पुढे मांडतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com