Sayaji Shinde  ओंकार कदम
मनोरंजन बातम्या

अभिनेते सयाजी शिंदे यांनी साजरा केला अनोख्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे...

साताऱ्यात हालगी ताशाच्या गजरात वडाच्या झाडाला फुटलेल्या पालवीचे केले अनोखे स्वागत

ओंकार कदम

सातारा - सयाजी शिंदे हे जसे अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत तसेच त्यांची निसर्ग प्रेमी म्हणून पण ख्याती आहे काही दिवसांपूर्वीच त्यांनी रस्त्याच्या कामामुळे तोडून टाकलेले शंभर वर्षांपर्वीचे झाड साताऱ्यातील (Satara) त्यांच्या देवराई मध्ये आणले. शंभर वर्षांपेक्षा जास्त वर्ष डौलात उभा असणारा हा वृक्ष रस्त्याच्या कामामध्ये मात्र कोसळला होता. पुणे (Pune) हडपसर येथून साताऱ्यात आणण्यात आलेल्या या झाडाला आता पालवी फुटली आहे. त्या झाडाला अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde)आणि देवराई कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील महस्वे येथील गोळीबार मैदान परिसरातील देवराई या ठिकाणी आणून त्याचे पुर्नरोपन केले होते. (Sayaji Shinde Latest News)

हे देखील पहा -

त्याला आता पालवी फुटली असून याचा आनंदोत्सव म्हणून खास व्हेलंटाईन डेच्या निमित्ताने त्याचे पुजन करुन या वडाच्या झाडाचे आणि त्याला फुटलेल्या पालवीचे खास स्वागत केले. फुटलेल्या पालवीचे पुजन अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पुर्वी झाडांवर प्रेम करावे याचा संदेश देण्यासाठी खास नऊवारीच्या वेशातील मुलींनी या पालवीच्या प्रतिकृतीची हलगी ताशाच्या गजरात देवराईतून मिरवणूक काढली.

या कार्यक्रमाला निसर्ग प्रेमींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून खास सातारा जिल्हा पोलिस प्रमुख अजय बन्सल यांनाही निमंत्रीत करण्यात आले. होते. यावेळी सयाजी शिंदे यांनी झाडांवर प्रेम करण्याबाबतचा सल्ला देताना त्यांनी शासनाला टोला लगावताना विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल न करता त्याचे पुर्नरोपन करण्याचा खास सल्ला त्यांनी त्यांच्या स्टाईलने दिला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party Case : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खेवलकरांची उच्च न्यायालयात धाव, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: पुणे -सातारा महामार्गावर कंटेनरने ५ वाहनांना दिली धडक, ५ जण जखमी

Home Cleaning Tips: लादी पुसताना पाण्यात टाका मीठ, नकारात्मक ऊर्जा होईल दूर

Bribe Case : गॅस एजन्सीवर कारवाई टाळण्यासाठी पावणेदोन लाखांची लाच; मुख्य निरीक्षण अधिकारी एसीबीच्या ताब्यात

Early signs of gastric cancer: पोटात कॅन्सरची गाठ तयार होण्यापूर्वी होतात 'हे' बदल; लक्षणं दिसताच डॉक्टरांची मदत घ्या

SCROLL FOR NEXT