Savi Sidhu SAAM TV
मनोरंजन बातम्या

Savi Sidhu : ऋषी कपूर अन् अक्षय कुमारसोबत सुपरहिट चित्रपटात काम; आता अभिनेता करतोय वॉचमनची नोकरी, कारण काय?

Savi Sidhu Security Guard Job : एकेकाळी मोठ्या कलाकारांसोबत काम करणारा अभिनेता आता वॉचमनची नोकरी करत आहे. हा अभिनेता कोण? त्याच्यासोबत नेमकं काय घडलं, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडमध्ये आज असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत नाव मिळवले आहे. असे अनेक कलाकार इंडस्ट्रीत येतात चित्रपटात काही रोल करतात आणि अपयश आल्यामुळे किंवा पुढे संधी न मिळाल्यामुळे अभिनयाचा मार्ग सोडतात. तर काही लोक परिस्थितीमुळे आयुष्यात असे निर्णय घेतात. या क्षेत्रात मोजकेच लोक यशस्वी होतात. मोठ्या कलाकारांसोबत काम करतात. आज आपण अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने आजवर अनेक मोठ्या बॉलिवूडच्या स्टारसोबत काम केले आहे.

अभिनेता सावी सिद्धूने (Savi Sidhu) ऋषी कपूर आणि अक्षय कुमार यांसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. त्याच्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करून ओळख निर्माण केली आहे. मात्र अभिनय क्षेत्रात त्याचे करिअर चमकले नाही त्यामुळे आता तो वॉचमनची (सुरक्षा रक्षक) नोकरी करत आहे. आर्थिक परिस्थिती बेतीची असल्यामुळे त्याला हे काम करावे लागत आहे. त्याच्या मदतीसाठी बॉलिवूडचे काही अभिनेते पुढे धावले आहे. यात राजकुमार राव आणि अनुराग कश्यप यांचा समावेश आहे.

सावी सिद्धू लहानाचा मोठा लखनऊमध्ये झाला आहे. तो मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी चंदीगडला आला. त्यानंतर वकिलीचा अभ्यास करण्यासाठी तो पुन्हा त्याच्या गावी गेला. त्यावेळी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर त्याने थिएटरमध्ये प्रवेश केला. सावीने 1995 मध्ये 'तखत' या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली.'तखत' या चित्रपटाचे निर्माते अनुराग कश्यप होते. त्यांना सावी सिद्धूचा अभिनय खूप आवडला. मात्र हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही.

अनुराग कश्यप यांनी त्यानंतर सावी सिद्धूला ब्लॅक फ्रायडे आणि गुलाल या चित्रपटाची ऑफर दिली. त्यानंतर सावी सिद्धूने अनेक चित्रपटात काम केले आहे. यात पटियाला हाउस , डे डी, बेवकूफियां या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र त्यानंतर तो अभिनय क्षेत्रातून गायब झाला. आता 5 वर्षांनंतर तो मुंबईत वॉचमनची नोकरी करताना पाहायला मिळत आहे. सावी सिद्धू अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला येथील एका बिल्डिंगमध्ये वॉचमनची नोकरी करताना दिसला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा सावी सिद्धूला त्याच्या अशा परिस्थितीबाबत विचारण्यात आले तेव्हा तो कारण सांगत म्हणाला की, माझ्या पत्नीला मी गमावले हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. त्यानंतर माझ्या वडिलांचे निधन झाले. मागोमाग आईही वारली. मी आता एकटाच आहे. त्याच्याकडे बसच्या तिकिटासाठी, चित्रपटाच्या तिकिटासाठी पैसे नाहीत. कारण त्याला वॉचमनची नोकरीत 12 तास मेहनत करावी लागते. ही बातमी समोर येताच अभिनेता राजकुमार रावने ट्विट करत सावी सिद्धूला पाठिंबा दिला. तो म्हणाला, "माझ्या सर्व कास्टिंग मित्रांना तुमच्याशी संपर्क साधण्यास सांगेन."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT