Salman Khan, Latest News Of Salman Khan, Salman Khan Death Threat From lawrence bishnoi Gang Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan : सलमान खानच्या वकिलाला धमकीचं पत्र; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुन्हा धमकी

लॉरेन्स बिश्नोई गँगकडून हे पत्र आल्याची माहिती आहे.

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूड विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अभिनेता सलमान खानचे वकील हस्तीमल सारस्वत यांना धमकीचं पत्र आलं आहे. 'सिद्धू मुसेवालाचे जसे हाल केले तसेच हाल तुझे करू'अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून हे पत्र आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. (Salman Khan Latest News)

विशेष बाब म्हणजे काही आठवड्यांपूर्वी सलमान खानलाही अशाच प्रकारचं धमकीचं पत्र आलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली होती. पुढे या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा सदस्य संतोष जाधव याची या धमकीप्रकरणी चौकशीही करण्यात आली होती. (Salman Khan Death Threat)

दरम्यान, आता सलमान खानच्या वकिलांनाही धमकीचं पत्र आल्याने पोलीस पुन्हा सतर्क झाले आहेत. वकील हस्तीमल सारस्वत यांना आलेलं हे धमकीचं पत्र जोधपूर हायकोर्टाच्या जुबली चेंबरच्या कुंडीत आढळून आल्याची माहिती आहे. या पत्रात लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकावण्यात आल्याचे संकेतही आढळून आले आहेत. (Salman Khan Threat Case - Lawrence Bishnoi Gang)

याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली असून सलमान खानचे वकील हस्तीमल सारस्वत यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT