Ranveer Singh Receives Threat Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh Receives Threat: रोहित शेट्टीनंतर रणवीर सिंगला मिळाली जीवे मारण्याची धमकी; बॉलिवूडमध्ये भीतीचं वातावरण

Ranveer Singh Receives Threat: अभिनेता रणवीर सिंगला धमकी मिळाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्याला व्हॉइस नोट पाठवून धमकी दिली आहे आणि कोट्यवधी रुपयांची मागणी केली आहे.

Shruti Vilas Kadam

रोहित शेट्टीनंतर रणवीर सिंगला जीवे मारण्याची धमकी

व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हॉइस नोट पाठवली धमकी

पोलिसांचा तपास सुरु

संजय गडदे, साम टिव्ही

Ranveer Singh Receives Threat: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याला व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हॉइस नोट पाठवून जीवे मारण्याची धमकी देत कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या या धमकीच्या संदेशामुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने दखल घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या व्यक्तीने रणवीर सिंगकडे कोट्यवधींच्या रकमेची मागणी केली असून पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल होताच मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला असून सायबर सेलच्या मदतीने धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी रणवीर सिंगच्या घराबाहेर आणि त्याच्या हालचालींवर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाची गंभीरतेने चौकशी सुरू असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

रणवीर सिंगने नुकताच प्रदर्शित झालेला धुरंधर हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. रणवीर सिंगपूर्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबाराची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून चाहत्यांमध्येही रणवीर सिंगच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

Maharashtra News Live Update: पुणे विषारी दारू प्रकरण, दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

Avoiding Chips and Cold Drink: चिप्स खाणं आणि कोल्ड ड्रिंक्स पीणं २१ दिवस बंद केल्यावर शरिरावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT