Kriti Sanon Prabhas Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prabhas: प्रभासच्या रिलेशनशिपवर रामचरणचे भाष्य, 'प्रभास सिंगल आहे...' या उत्तराने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या...

रामचरणने प्रभासच्या लव्हलाईफवर काही खास वक्तव्य केले आहे.

Chetan Bodke

Prabhas: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या 'आदिपुरूष' चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. त्याचा बाहुबली चित्रपटामुळे एक वेगळाच चाहतावर्ग तयार झाला आहे. त्याच्या चित्रपटातील भूमिकेमुळे बराच चर्चेत आला आहे. प्रभासचे चाहते त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी उत्सुक असतात.

'आदिपुरूष' चित्रपटाला जरी नेटकऱ्यांकडून नकार मिळत असला तरी त्याची रामाची भूमिका सर्वांना आवडली. सोबतच चित्रपटात क्रीती सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामुळे ही जोडी कमालीची चर्चेत आहे. नुकतच त्यांच्या बाबतीत एक नवी माहिती समोर आली आहे. प्रभासने नुकतीच नंदमुरी बाळकृष्ण यांच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

यावेळी मुलाखतीच्या कार्यक्रमात एक खेळ होता ज्यात नंदमुरी यांनी अभिनेता रामचरणला फोन करून प्रभासच्या लव्ह लाईफबद्दल विचारले, त्यांच्या संभाषणादरम्यान राम चरण यांनी स्पष्ट सांगितले की ‘प्रभास सिंगल आहे तो कोणत्याही मुलीला डेट करत नाहीये,’ असे सांगितले.

कार्यक्रमात प्रभासला एक प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हा तो म्हणतो, “आधी सलमान खानला लग्न करू द्या, मग मी करेन.” त्याच्या या उत्तराने उपस्थितांना हसू काही आवरले नाही. या दोघांनाही त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा विचारण्यात आले आहे. पण त्यांनी माध्यमांना नाही, असेच उत्तर दिले आहे. त्यांच्या दोघांच्या नात्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे.

प्रभास आणि क्रितीचाहा पहिलाच एकत्र चित्रपट आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रभास आणि क्रितीसह सैफ अली खान आणि सनी सिंह मुख्य भूमिकेत आहे. ओम राऊत दिग्दर्शित चित्रपट येत्या आगामी वर्षात १६ जून २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Record : रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियात रचला इतिहास; विराट, सचिन तेंडुलकरही मागे पडले

Kalyan: दोन गटात तुफान राडा, दगडफेक- तोडफोड अन् हाणामारी; एकमेकांची डोकी फोडली; VIDEO व्हायरल

Festive Car Sales: सणासुदीच्या काळात 'या' ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: कार्यकर्त्यांवर होणाऱ्या संभाव्य खोट्या गुन्ह्यांना उत्तर देण्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या नेत्याची 'अनोखी शक्कल'

Kuchipudi Dance History: 'या' गावाच्या नावावरून कुचीपुडी नृत्याचे नाव पडले, जाणून घ्या त्याचा इतिहास

SCROLL FOR NEXT