Khurchi Motion Poster Instagram
मनोरंजन बातम्या

Khurchi Motion Poster: सत्तेच्या ‘खुर्ची’वर अधिकार गाजवायला येतोय ‘हा’मराठमोळा अभिनेता, चित्रपटाचा धडाकेबाज पोस्टर रिलीज

Khurchi Poster: अभिनेता राकेश बापट ‘खुर्ची’ चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.

Chetan Bodke

Khurchi Motion Poster

राज्याच्या राजकारणावर भाष्य करणारे अनेक चित्रपट आणि वेबसीरीज गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झाले होते. त्यामध्ये, निवडणुकीचा धुरळा, सत्तासंघर्ष अशा अनेक मु्द्द्यांवर भाष्य करण्यात आले होते.

अशातच, गेल्या काही दिवसांपूर्वी ‘खुर्ची’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका कोण साकारणार?, याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर त्या प्रश्नाचं उत्तर चाहत्यांना मिळाले आहे. अभिनेता राकेश बापटने चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. (Marathi Film)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सत्तेसाठी खेळल्या जाणाऱ्या या लढाईमध्ये, राकेश बापट महत्वपूर्ण भूमिका साकारत असल्यामुळे सर्वांनाच चित्रपटाबद्दलची उत्सुकता आहे. आत्मनिर्भर, स्वबळाने आणि मुख्यत्वे बुद्धीचा वापर करून स्वतःच विश्व निर्माण करणाऱ्या राकेशच्या अभिनयाची अनेकदा चर्चा होते. आजवर राकेशने आपल्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता पुन्हा एकदा राकेशमधील करारीपणा ‘खुर्ची’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. (Marathi Actors)

‘खुर्ची’साठीची लढाई राकेश लढणार का? आणि चित्रपटातील सत्तेसाठीच्या या लढाईत राकेशला खुर्ची मिळणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत ‘आराध्या मोशन फिल्म्स’ आणि ‘योग आशा फिल्म्स’ निर्मित चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी आणि प्रदीप नत्थीसिंग नागर यांनी बरोबरीने सांभाळली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष कुसुम हगवणे असून दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केले आहे. (Latest News)

चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत राकेश बापट, अक्षय वाघमारे, आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घग, अभिनेत्री प्रीतम कांगणे, कल्याणी नंदकिशोर, श्रेया पासलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपट पुढच्या वर्षी अर्थात १२ जानेवारी २०२४ रोजी थिएटर मध्ये प्रदर्शित होणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

५० लाख ओबीसी बांधव मुंबईत धडकणार; आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण आणखी तापणार|VIDEO

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये ईद-ए-मिलाद निमित्त भव्य मिरवणूक

Ticket Collector: '...तर मी रोज प्रवास करेन', ट्रेनमधील हँडसम TC ला पाहून तरुणी पडली प्रेमात, VIDEO

Aadhaar Card: नागरिकांना सुप्रीम कोर्टाचा 'आधार'; नागरिकत्वासाठी आधार कार्ड ग्राह्य धरा, निवडणूक आयोगाला आदेश

Nagpur Crime : एटीएममधून पैसे चोरीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने अडकला, चोरटा पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT