Swapnil Joshi Special Post For Daughter Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swapnil Joshi: स्वप्नीलने लेकी साठी लिहिली खास पोस्ट; 'या' कारणामुळे स्वप्नीलचा फादर्स डे झाला खास

Swapnil Joshi Special Post For Daughter: अभिनेता निर्माता स्वप्नील जोशीने त्याचा लेकी बद्दल खास पोस्ट लिहून तिचं तोंडभरून कौतुक केलं फक्त स्वप्नील नाही तर संपूर्ण इंडस्ट्री ने स्वप्नीलची लेक मायराच कौतुक केलं आहे

Shruti Vilas Kadam

Swapnil Joshi Special Post For Daughter: प्रत्येक मुली साठी तिचा बाबा हा सुपरहिरो असतो आणि त्या बाबा साठी आपली लेक ही सर्वस्व असते ! अभिनेता निर्माता स्वप्नील जोशी सोबत असं काहीतरी घडलं की त्याने त्याचा लेकी बद्दल खास पोस्ट लिहून तिचं तोंडभरून कौतुक केलं फक्त स्वप्नील नाही तर संपूर्ण इंडस्ट्री ने स्वप्नीलची लेक मायराच कौतुक केलं आहे या मागचं कारण बघताना कळतंय की स्वप्नील मागोमाग आता त्याची लेक मायरा ने देखील कलाविश्वात पदार्पण केलं आहे.

अनेक कलाकार आणि त्यांची मुल या इंडस्ट्रीचा भाग आहेत अश्यातच स्वप्नील जोशी ची चिमुकली हिने एका गोड गाण्यातून या इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आहे. अवधूत गुप्ते याने स्वरबद्ध केलेल्या " सांग आई " या गाण्यात मायरा जोशीने अभिनय केला आहे. बाबाच्या पाऊलावर पाऊल ठेवत लेक देखील या इंडस्ट्रीचा भाग झाली आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही.

स्वप्नीलसाठी हा फादर्स डे नक्कीच या गाण्यामुळे खास झाला आणि त्याला रिटर्न गिफ्ट देखील मिळालं आहे. स्वप्नील ने सोशल मीडिया वर एक खास पोस्ट लिहून त्याचा लेकीच कौतुक तर केलं आहे सोबतीला स्वप्नील सांगतो "आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे. मायराच्या आवडी पोटी तिने केलेलं हे छोट काम आहे. हे तिचं सिने सृष्टीतील पदार्पण नाही पण तुम्ही सगळ्यांनी तिला जे प्रेम दिलं त्या बद्दल सगळ्यांचे आभार ! आमच्या सगळ्यासाठी हा तिचा क्षण खूप मौल्यवान आहे. तिने तिच्या बाबा ला दिलेलं हे खास गिफ्ट आहे"

स्वप्नीलने बाल कलाकार म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केल्यानंतर आता लेकीला या खास गाण्यातून बघताना त्याला खूप आनंद होतोय. येणाऱ्या काळात या बाप लेकीची जोडी ऑन स्क्रीन बघायला मिळणार का ? हा प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडतोय !

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kataldhaar Waterfall: पुण्यापासून अगदी २ तासांच्या अंतरावर आहे पांढराशुभ्र धबधबा; कसं जाऊ शकता आताच वाचा!

EPFO Latest Update : EPFO चा नवा नियम, आता घरे खरेदी करताना काढता येणार PF चे पैसे, प्रोसेस काय? जाणून घ्या

Senior Citizen Health: घरातील वृद्धांना दात दुखीचा त्रास? मग आहारात 'हे' मऊ आणि पौष्टिक पदार्थ द्या

Nagpur : नागपुरात युनियन बँकेविरोधात मनसेचा संताप, मराठीतील FIR नाकारल्याने आंदोलन | VIDEO

Kalyan : कल्याणकरांची वाहतूक कोंडीची कटकट संपणार, यु टाईप अन् मलंगगडचे रस्ते चकाचक होणार

SCROLL FOR NEXT