Naga Chaitanya And Sobhita Dhulipala Engagement Photos Saam Tv
मनोरंजन बातम्या

Naga Chaitanya And Sobhita Dhulipala : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी उरकला साखरपुडा, नागार्जुनकडून फोटो शेअर

Naga Chaitanya And Sobhita Dhulipala Engagement : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलीपालाशी साखरपुडा केला आहे. अभिनेता आणि नागाचैतन्यचे वडील नागार्जुन यांनी साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

Chetan Bodke

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलीपालाशी साखरपुडा केला आहे. आज (८ ऑगस्ट) नागा चैतन्य आणि शोभिताचा साखरपुडा पार पडला. नागार्जुन यांच्या घरी हा साखरपुडा पार पडला असून साखरपुड्याचे खास फोटो नागार्जुन ह्यांनी एक्सवर शेअर करत चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली आहे.

अभिनेता नागार्जुन ह्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये शोभिता आणि नागा चैतन्य खूपच सुंदर दिसत आहे. साखरपुड्यातल्या दोघांच्याही लूकने सर्वांचेच वेधले आहे. एक्सवर नागार्जुन यांनी साखरपुड्याचे फोटो शेअर करत कॅप्शन दिले की, "आमचा मुलगा नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला यांचा आज सकाळी ९:४२ वाजता साखरपुडा झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे... शोभिताचे आमच्या कुटुंबात स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आनंदी जोडप्याचे अभिनंदन! त्यांना आयुष्यभर प्रेम आणि आनंदासाठी शुभेच्छा... ८.८.८ अनंत प्रेमाची सुरुवात," असं कॅप्शन देत नागार्जुन यांनी आपल्या लेकाच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

साखरपुड्यासाठी नागा चैतन्य आणि शोभिताने खास दाक्षिणात्य पारंपारिक लूक कॅरी केला होता. साखरपुड्यासाठी शोभिता धुलिपालाने फिकट गुलाबी साडी आणि केसांत अबोली गजरा असा लूक कॅरी केलेला होता. तर नागार्जुनने व्हाईट कलरचा कुर्ता, पायजमा आणि उपरणं कॅरी केलेला होता. दोघंही साखरपुड्यामध्ये खूपच सुंदर दिसत होते. अतिशय मोजक्याच पाहुण्यांमध्ये त्यांनी साखरपुडा केला आहे. चैतन्य आणि शोभिताला इंडस्ट्रीतील अनेक कलाकार मंडळी शुभेच्छा देत आहेत.

मिडिया रिपोर्टनुसार, नागा चैतन्य आणि शोभिता २०२४ मध्येच लग्नगाठ बांधणार आहे. नागा चैतन्य आणि शोभिताच्या रिलेशनची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. २०२२ पासून नागा चैतन्य आणि शोभिता एकमेकांना डेट करत आहेत. अखेर त्यांनी आज साखरपुडा करत आपलं नातं अधिकृत केलं आहे.

नागा चैतन्यचं हे दुसरं लग्न आहे. अभिनेत्याने पहिलं लग्न २०१७ मध्ये अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत केलं होतं. त्यानंतर त्यांचे चार वर्ष लग्न टिकले. पण, लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांच्या मतभेद सुरू झाले. त्यामुळे नागा चैतन्य आणि समांथा ऑक्टोबर २०२१ मध्ये वेगळे झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; ठाकरेंच्या आमदाराच्या निवडणूक प्रचारात CM फडणवीसांचा फोटो|VIDEO

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT