Mukesh Khanna SAAM TV
मनोरंजन बातम्या

वयाच्या ६६ व्या वर्षी Mukesh Khanna बनले शक्तीमान; प्रचंड ट्रोल केले, बरीच नावं ठेवली!

Mukesh Khanna Trolled For Shaktiman : वयाच्या ६६व्या वर्षी मुकेश खन्ना यांना शक्तीमानच्या लूकमध्ये पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. नेटकरी काय म्हणाले जाणून घ्या.

Shreya Maskar

लहान मुलांचा आवडता कार्यक्रम 'शक्तीमान' (Shaktiman ) पुन्हा मुलांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत 'शक्तीमान'च्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना पाहायला मिळत आहेत. एकिकडे चाहते 'शक्तीमान'च्या भूमिकेत मुकेश खन्ना यांना पाहून आनंद व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे काही नेटकरी त्यांना ट्रोल देखील करत आहेत.

नुकतेच मुकेश खन्ना (Mukesh Khanna) शक्तीमानचा लूक करून मीडियासमोर आले होते. वयाच्या ६६ व्या वर्षी मुकेश खन्ना शक्तीमानचा लूक करून आल्यामुळे लोकांनी त्यांना खूप ट्रोल केले. त्यांच्या पोटाची आणि राखाडी केसांची खिल्ली उडवली. नेटकऱ्यांनी मुकेश खन्ना यांना 'पेटुमन' असे नाव दिलं आहे.

आता शक्तीमान मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अलिकडेच चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझर पाहून चाहते खूप आनंदी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये मुकेश खन्ना हे शक्तीमानच्या लूकमध्ये पाहायला मिळत आहेत. मुकेश खन्ना यांच्या शक्तीमानचा लूक पाहून एका युजरने लिहिलं की, "लहानपणी हे पाहून मला आनंद व्हायचा, मात्र आता लाज वाटते." दुसऱ्या युजरने लिहिलं की, "सर तुम्ही या वयात शक्तीमानची भूमिका साकारताय, हे शक्तीमानला देखील शोभणार नाही." तर एकाने लिहिलं की, "बालपणीच्या सर्व आठवणी उध्वस्त केल्या आहेत." अशा असंख्य कमेंट्सने मुकेश खन्ना यांना ट्रोल करण्यात आले आहे.

'शक्तीमान' ही मालिका 1997 मध्ये सुरू झाली होती. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर घर केलं होत. आजही प्रेक्षक या शोचे जुने एपिसोड पुन्हा पाहतात. 'शक्तीमान'ने बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT