Mahesh Babu Net Worth Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mahesh Babu Net Worth : मानधन, एकूण संपत्ती आणि बरंच काही… महेश बाबूबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Mahesh Babu Birthday : साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये महेश बाबूचा समावेश होतो. आज (९ ऑगस्ट) अभिनेत्याचा ४९ वा वाढदिवस आहे.

Chetan Bodke

साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये महेश बाबूचा समावेश होतो. त्याचे स्टारडम मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आज (९ ऑगस्ट) अभिनेत्याचा वाढदिवस आहे. अभिनेता आज ४९ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. महेश बाबूच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊया...

महेश बाबू इंडस्ट्रीतला हायेस्ट पेड आणि मोस्ट टॅलेंटेड स्टार म्हणून त्याची ओळख आहे. महेश बाबूने आपल्या अभिनयासोबत डॅशिंग पर्सनॅलिटीनेही चाहत्यांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महेश बाबू एका चित्रपटासाठी कोट्यवधी मानधन आकारतो. मिडिया रिपोर्टनुसार महेश बाबूची एकूण संपत्ती २५० कोटींच्या दरम्यान आहे. महेश बाबूचा सर्वात श्रीमंत कलाकारांच्या यादीमध्ये समावेश होतो. महेश बाबू एका चित्रपटासाठी १२० ते १२५ कोटी इतके मानधन स्वीकारतो.

एस एस राजामौली यांच्यासोबत महेश बाबू 'SSMB29' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटासाठी त्याने १२५ कोटी रुपये फी स्वीकारली आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महेश अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महेश शेवटचा त्रिविक्रम श्रीनिवास यांच्या 'गुंटूर करम' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. कोईमोईने दिलेल्या माहितीनुसार, महेशने त्या चित्रपटासाठी ७८ कोटी रुपये मानधन स्वीकारले होते.

मीडिया रिपोर्टनुसार, सुरुवातीला महेश बाबू एका चित्रपटासाठी जवळपास ५५ कोटी रुपये मानधन आकारायचा. मात्र त्याच्या वाढत्या क्रेझमुळे त्याने त्याच्या मानधनात वाढ केली आहे. महेश बाबूचे मासिक उत्पन्न २ कोटी इतके आहे. त्याची सर्वाधिक कमाई चित्रपटांमधून होते. अभिनेत्याकडे लक्झरी कारचे कलेक्शनही आहे. फायनान्शिअल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हैदराबादच्या ज्युबली हिल्स येथील अभिनेत्याच्या बंगल्याची किंमत ३० कोटी रुपये आहे. 2005 मध्ये त्यांनी अभिनेत्री-उद्योजक नम्रता शिरोडकरशी लग्न केले आणि त्यांना सितारा घट्टमनेनी आणि गौतम घट्टमनेनी ही दोन मुले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phone Scam: मोबाइल फोन सारखा ट्रिंग ट्रिंग करतोय, मोठा फ्रॉड होण्याचा धोका, हे 5 संकेत आधीच ओळखा

Dhurandhar Cast Net Worth: रणवीर सिंग, अक्षय खन्ना की संजय दत्त, जाणून घ्या कोणता धुरंधर आहे सर्वात श्रीमंत

Maharashtra Live News Update: मुंबई नाशिक महामार्गावर दोन बाईक अपघातात कल्याण डोंबिवली येथील नवरा बायकोचा जागीच मृत्यू

Kitchen Hacks : भांडी धुतल्यानंतर ही भांड्यांना दुर्गंधी येते? मग हि सोपी ट्रिक करा फोलो

Viral Video : आधी पायाखाली चिरडलं, नंतर सोंडेने उचलून आपटलं; हत्तीसोबत सेल्फी घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT