Deepika Padukone Look In Project K Instagram @vyjayanthimovies
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone In Project K : तिच्या नजरेत जादू आहे... 'प्रोजेक्ट के'मधील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक आऊट

Deepika Padukone Look In Project K : दीपिका पदुकोणच्या लूकची पहिली झलक समोर आहे आहे.

Pooja Dange

Deepika Padukone First Look In Project K : प्रोजेक्ट K या आगामी चित्रपटाची जबदस्त चर्चा आहे. मंगळवारी या चित्रपटाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटातील दीपिका पदुकोणच्या लूकची पहिली झलक समोर आहे आहे. पोस्टरवर दीपिकाचा क्लोज-अप फोटो आहे आणि चित्रपटाबद्दल किंवा ती कोणाची भूमिका साकारत आहे याबद्दल माहिती मिळत आहे.

दीपिका पदुकोण नेहमीप्रमाणे आकर्षक दिसत आहे. प्रॉडक्शन बॅनर वैजयंती मूव्हीजने दीपिकाचा फर्स्ट लूक पोस्ट केला. तसेच या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे: "उद्याच्या भल्यासाठी एक आशेचा किरण. ही प्रोजेक्ट के मधील दीपिका पदुकोण आहे." बहुप्रतिक्षित चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. (Latest Entertainment News)

या महिन्याच्या सुरुवातीला, प्रोजेक्ट K हा सॅन डिएगो येथील या वर्षीच्या कॉमिक कॉनचा भाग असेल, हा येथे प्रदर्शित होणारा भारतातील पहिला चित्रपट असल्याचे उघड झाले. दीपिका पदुकोण आणि इतर कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. "कॉमिक कॉनवर जाणाऱ्या पहिल्या भारतीय चित्रपटाचा भाग असल्याचा अभिमान वाटतो. तिथे भेटू," असे दीपिकाने इंस्टाग्रामवर लिहिले आहे.

प्रोजेक्ट के चे शीर्षक आणि ट्रेलर या महिन्याच्या शेवटी कॉमिक कॉन येथे प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

कॉमिक कॉनमध्ये आगामी चित्रपटांचे पूर्वावलोकन आणि पॅनेलचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या अभिनेते आणि लेखकांच्या संपामुळे हॉलीवूड बंद झाले आहे. नेटफ्लिक्स, डिस्ने, एचबीओ, युनिव्हर्सल आणि सोनी यासारख्या मार्वल आणि इतर स्टुडिओने या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती आधीच रद्द केली आहे.

याचा प्रोजेक्ट के पॅनेलवर परिणाम होणार नाही कारण त्यातील एकही कलाकार SAG-AFTRA चे सदस्य नाही, जे सुमारे 1,60,000 कलाकारांचे प्रतिनिधीत्व करते जे सर्व आता संपावर आहेत. दरम्यान, प्रोजेक्ट के ने टाइम्स स्क्वेअर, न्यूयॉर्कमध्ये आधीच आपली उपस्थिती दर्शवली आहे.

प्रोजेक्ट के हा नाग अश्विन दिग्दर्शित एक साय-फाय चित्रपट आहे आणि हा चित्रपट पुढील जानेवारीत रिलीज होईल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबईत अनेक घरे; २०० पेक्षा जास्त चेले; बांगलादेशी किन्नरजवळ सापडलं कोट्यवधींचं घबाड

Maharashtra Live News Update : जालन्यातील लाचखोर आयुक्ताला कोर्टाचा दणका, जामीन फेटाळला

Telangana Band: महाराष्ट्रानंतर तेलंगणामध्ये आरक्षणाचा वाद पेटला; तोडफोडीनंतर अनेक शहरं ठप्प

अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्यूवर संतापले जय शाह, BCCI नेही केला निषेध; आता पाकिस्तानच काही खरं नाही!

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

SCROLL FOR NEXT