Famous Actor  saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याचे १२ वर्षानंतर धमाकेदार कमबॅक, पहिली झलक तुम्ही पाहिली का?

Famous Actor Comeback In Television After 12 Years : प्रसिद्ध अभिनेता आता १२ वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी टिव्हीवर येत आहे. त्याचा धमाकेदार प्रोमो समोर आला आहे.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेता १२ वर्षानंतर धमाकेदार कमबॅक करत आहे.

अभिनेता एका लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे.

अभिनेत्याची पहिली झलक समोर आली आहे.

मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याची तब्बल १२ वर्षांनी टिव्हीवर धमाकेदार एन्ट्री होत आहे. 'झी मराठी' वाहिनीवर पुन्हा एकदा हा अभिनेता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. प्रेक्षकांचा लाडका सत्यजित पुन्हा एकदा भेटीला येत आहे. सत्यजित नाव ऐकताच आठवते ते म्हणजे 'तू तिथे मी' ही मालिका. या मालिकेतील सत्यजित-मंजिरीची जोडी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

'तू तिथे मी' मालिकेत सत्यजितच्या भूमिकेत मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरने साकारली होती. तर मंजिरीच्या भूमिकेत मृणाल दुसानिस झळकली होती. आता पुन्हा एकदा १२ वर्षांनतर चिन्मय मांडलेकर मालिका विश्वात येत आहे. नुकताच याचा एक खास प्रोमो समोर आला आहे. चिन्मय मांडलेकर आता 'सनई चौघडे' या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत देखील त्याच्या भूमिकेचे नाव सत्यजित असेच आहे.

'झी मराठी' ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चिन्मय मांडलेकरची एक झलक पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला त्यांनी हटके कॅप्शन दिले आहे. त्यांनी लिहिलं की, "अगदी योग्य मुहूर्तावर होणार सत्यजितची दणक्यात एंट्री!" या व्हिडीओवर चाहते भरभरून कमेंट्स करताना दिसत आहेत. व्हिडीओत चिन्मय मांडलेकरचा एक डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे.

'सनई चौघडे' मालिकेत शर्वरी नवीन जॉब शोधत आहे. त्यामुळे सत्यजित तिचा बॉस असू शकतो, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र अद्याप कोणतीच गोष्ट स्पष्ट झाली नाही. सनई चौघडे ही मालिका झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 8.30 वाजता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'बाबा, हा शेवटचा कॉल, यापुढे...; भरस्त्यात मुलीनं चापट मारणं जिव्हारी लागलं, तरुणानं लिंबाच्या झाडाजवळ जीवन संपवलं!

Pandharpur Vitthal Temple: विठ्ठल दर्शनाचा काळा बाजार आला समोर; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

पाकिस्तान भूगोलात राहायचं की इतिहासात? लष्करप्रमुखांचा शेजारील देशाला इशारा

भीषण अपघाताचा थरार! भरधाव कार कंटेनरला धडकली, ५ जणांचा जागीच मृत्यू

'काही बेरोजगार युवक म्हणजे कॉक्रोच', सरन्यायाधीशांच्या विधानानं नवा वाद

SCROLL FOR NEXT