Chhavi Mittal Diagnosed With Costochondritis Instagram @chhavihussein
मनोरंजन बातम्या

Chhavi Mittal Share Post: कॅन्सरचा लढा जिंकल्यानंतर अभिनेत्रीला पुन्हा गंभीर आजाराने ग्रासले; पोस्ट शेअर करत दिली अपडेट

Chhavi Mittal Update : कॅन्सरवर मात दिल्यानंतर अभिनेत्रीला कॉस्टोकॉन्ड्राइटिस हा आजार झाला आहे.

Pooja Dange

Chhavi Mittal Diagnosed With Costochondritis : टीव्ही जगातील प्रसिद्ध अभिनेत्री छवी मित्तल नेहमीच चर्चेत असते. गेल्या वर्षी अभिनेत्री ब्रेस्ट कॅन्सरने त्रस्त होती. कॅन्सरला झुंज जिंकल्यानंतर छवी मित्तल तिच्या फोटोंमुळे ट्रोल होत होती.

परंतु आज अभिनेत्री आता पुन्हा चर्चेत आली आहे. कॅन्सरवर मात दिल्यानंतर अभिनेत्रीला कॉस्टोकॉन्ड्राइटिस हा आजार झाला आहे.

छवी मित्तलने तिच्या या आजाराविषयी सोशल मीडियावर खुलासा करत लिहिले आहे की, छातीत कार्टिलेजला दुखापत झाल्याने हा आजार होतो. माझ्या या आजार कारण कॅन्सरचा उपचार किंवा ऑस्टियोपेनियासाठी मी घेतलेल्या इंजेक्शनच्या रिऍक्शनमुळे किंवा सतत होणाऱ्या खोकल्यामुळे हे झाले असेल. हे अनेक गोष्टीच्या परिणाम झाल्याने होतं.'

छवीने सांगितल्याप्रमाणे, 'तिला श्वास घेतलामी तिचे हातांचा वापर करताना, उठता-बसताना, हसताना प्रत्येकवेळी तिला त्रास होतो.'

छवी मित्तल यावेळीही या आजाराविरुद्ध धैर्याने लढत आहे. अभिनेत्री पुढे म्हणाली, 'नाही, मी नेहमीच सकारात्मक नसते, परंतु मी क्वचितच नेगटीव्ह विचार करते. मला त्रास होत असताना देखील मी जिमला गेले. याचा कारण तुम्हाला काय वाटत? आपण सगळे खाली पडतो, पण पुन्हा उठतो का? मी उठले नई लढते.

छवीने तिची पोस्ट एका सकारात्मक नोटवर एन्ड करत छवीने लिहिले की, 'ज्यांना ज्यांना हे ऐकायचं आहे त्यांच्यासाठी.. मला माहित आहे आपण कोणता ना कोणता त्रास सहन करत असतो.. पण तुम्ही एकटे नाही! आणि हे देखील सारून जाईल. आरोग्य हीच संपत्ती आहे.' (Celebrity)

छवी मित्तलची ही पोस्ट पाहून अभिनेत्रीचे चाहते तिच्याविषयी काळजी करत आहेत. चाहते पोस्टवर कमेंट करून छवी मित्तलच्या प्रकृतीसाठी सतत शुभेच्छा देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, 'तुला खूप प्रेम... पुढे जाण्याची तुझी जिद्द, तू हे करू शकतेस आणि तू बेस्ट आहेस.' दुसऱ्या युजरने लिहिले आहे, 'तू प्रेरणास्थान आहेस.'

छवी मित्तल अनेकदा सोशल मीडियावर युजर्सना कॅन्सर सर्व्हायव्हर म्हणून तिचा प्रवास शेअर करते. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Teacher Harassment : विद्यार्थीनीवर शिक्षकाची वाईट नजर, पालकांनी अकॅडमीमध्ये जाऊन दिला चोप, नालासोपाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update: मुंबई-नवी मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात

Maharashtra Politics : राज ठाकरेंना मोठा झटका, मनसेचा बडा नेता भाजपच्या वाटेवर

RBI Rule: बँकेत किती रुपयांपर्यंत पैसे सुरक्षित असतात? RBI किती पैशांची गॅरंटी देते, वाचा सविस्तर

Smart Villages: प्रत्येक तालुक्यातील 10 गावे होणार स्मार्ट; देशातील पहिले ‘स्मार्ट’ गाव कोणतं, काय आहेत सुविधा?

SCROLL FOR NEXT