Musafiraa Marathi Movie Title Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Musafiraa Title Song: मैत्रीची नवीन परिभाषा ‘मुसाफिरा’ सांगणार, चित्रपटाचे टायटल साँग रिलीज

Musafiraa Marathi Movie Song: मैत्रीच्या अनेक सुखद आठवणींना उजाळा देणारे, दूर गेलेल्या मित्रांना एकत्र आणणारे आणि मैत्रीची नवीन परिभाषा सांगणाऱ्या ‘मुसाफिरा’ चित्रपटातलं टायटल साँग रिलीज झाले आहे.

Chetan Bodke

Musafiraa Marathi Movie Title Song Released

प्रत्येकासाठी मित्र हा खास असतो. जरीही मित्रामित्रांमधलं नातं रक्ताचं नातं नसलं तरी ते नातं जीवाभावाचं असतं. कायमच मित्र- मैत्रीणी एकमेकांसोबत मनामध्ये कुठलाही द्वेष किंवा मोह न ठेवत एकमेकांसोबत खुल्या मनाने गोष्टी शेअर करत असतात. मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, जे मैत्रीवर भाष्य करतात. अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली. नुकतंच ‘मुसाफिरा’ चित्रपटातलं टायटल सॉन्ग रिलीज झालं आहे.

गाण्याचं नाव ‘मुसाफिरा’ असं असून हे गाणं बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक विशाल दादलानी यांनी गायले आहे. तर या टायटल सॉंगला रोहन- रोहन यांचे संगीत लाभले आहे. तर मंदार चोळकर यांनी हे गाणं शब्दबद्ध केले आहे. तरुणाईला आवडेल असं हे गाणे आहे. मैत्रीचे नाते हे प्रत्येकासाठी खास असते. एकत्र फिरणे, हसणे, खेळणे, रडणे अशा अनेक गोष्टी मैत्रीत केलेल्या असतात, अगदी भांडणेही. मैत्रीच्या या अशाच सुखद आठवणींना उजाळा देणारे आणि दूर गेलेल्या मित्रांना एकत्र आणणारे हे गाणे आहे. यात धमाल, प्रेम, मैत्री अशा अनेक भावना आहेत. मैत्रीची नवीन परिभाषा सांगणारा हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गाण्याविषयी विशाल दादलानीने सांगितले की, “मला मराठी गाणी गायला खूप आवडतात. यापूर्वीही मी मराठी गाणी गायली आहेत. या शब्दांमध्ये खूप भावना दडलेल्या असतात. हे गाणे निश्चितच ऊर्जा देणारे असले तरीही याचा भावार्थ खूप खोलवर आहे. हे गाणे गाताना मी खूप एन्जॅाय केले आहे. जुन्या मैत्रीची आठवण करून देणारे हे जबरदस्त गाणे आहे.”

आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन्स आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’ चित्रपटाचे भव्य पोस्टरचे रिलीज झाले होते. यावेळी चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली. चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर जोगने केले असून बिग बजेट चित्रपटाची निर्मिती वैशाली शहा, राहुल व्ही. दुबे आणि डॉ. कादंबरी जेठवानी यांनी केली आहे. या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

SCROLL FOR NEXT