Allu Arjun Saam Tv
मनोरंजन बातम्या

Allu Arjun : बॉलिवूड निर्मात्यांना २०२६ पर्यंत अल्लू अर्जुनची वाट पहावी लागणार, कारण आले समोर

अल्लू अर्जुनकडे पुढील तीन वर्षे वेळ नाही. अभिनेता अल्लू अर्जुनने २०२६ पर्यंत व्यग्र असणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने(Allu Arjun) सिनेमासृष्टीत पक्क स्थान केलं आहे. अल्लू अर्जुनने सुपरहिट 'पुष्पा'(Pushpa) या चित्रपटातून विविध भूमिका साकारत रसिकांची मने जिकंली आहेत. 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनला आता मोठमोठ्या निर्मात्यांची मागणी येत आहे. केवळ टॉलीवूडचे निर्माते नाही तर बॉलिवूडचे निर्मातेही अल्लू अर्जुनला त्यांच्या चित्रपटाचा भाग होण्यासाठी प्रेरित करत आहे. पण अडचण अशी आहे की, अल्लू अर्जुनकडे पुढील तीन वर्षे वेळ नाही. अभिनेता अल्लू अर्जुनने २०२६ पर्यंत व्यग्र असल्याची माहिती दिली आहे.

अलीकडेच अल्लू अर्जुनने 'पुष्पा २' या चित्रपटाची घोषणा केली आहे. यासोबतच त्याच्याकडे एटली कुमार, वेणू श्रीराम, कोर्टाला सिवा आणि एस राजामौली यांसारख्या दक्षिणेतील अनेक दिग्गज दिग्दर्शकांचे चित्रपट आहेत. अर्जुनकडे टॉलीवूडचे इतके चित्रपट आहेत की तो बॉलिवूड चित्रपट करण्याचा विचारही करू शकत नाही, हे स्पष्ट आहे.

टॉलीवूडच्या अल्लू अर्जुनला आता बॉलीवूडच्या निर्मात्यांची ओढ लागली आहे. मोठमोठे निर्माते-दिग्दर्शकांना अर्जुनला त्यांच्या चित्रपटात घ्यायचे आहे. दरम्यान, प्रसिध्द दिग्दर्शक- निर्माते संजय लीला भन्साळी अल्लू अर्जुनसोबत त्याचा आगामी चित्रपट बनवण्याची योजना आखत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

यासाठी त्याने मार्चमध्ये अल्लू अर्जुनसोबत भेटही घेतली आहे. भेटीदरम्यान संजय लीला भन्साळीने 'पुष्पा'मधील अल्लू अर्जुनच्या कामाचे कौतुक केले. त्याने सांगितले की, अल्लूचे यापूर्वीचे अनेक चित्रपट पाहिले आहेत. यासोबतच भन्साळींने त्याच्यासोबत पुढील चित्रपटाची आखणी करत असल्याच स्पष्ट केलं आहे. मात्र अर्जुनने सध्या वेळ नाही. त्याने त्याच्या आगामी चित्रपटांचे काम सुरू केले आहे आणि त्यामधून त्याला थोडा वेळ मिळाला तरच तो संजय भन्साळीचा चित्रपट करू शकेल. अन्यथा २०२६ नंतर संजयसोबत चित्रपट करू शकेल असे स्पष्टपणे सांगितले आहे.

दिग्दर्शक - निर्माते संजय लीला भन्साळी शिवाय बॉलिवूडमधील आणखी दोन मोठे निर्माते अल्लू अर्जुनला भेटल्याचे वृत्त समोर आले आहे. परंतु तारखांमुळे अडचणी येत आहेत. अल्लू अर्जुन चित्रपटाच्या ऑफर आणणाऱ्या सर्व निर्माता दिग्दर्शकांना एक गोष्ट स्पष्टपणे सांगु इच्छितो की, तो संपूर्ण भारताचा स्टार आहे. त्यामुळे कोणत्याही किंमतीत अभिनेता चित्रपटात सेकंड लीडची भूमिका साकारणार नाही. विशेष म्हणजे अर्जुनलाही बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवायचे आहेत. बॉलिवूड हे कोणत्याही प्रादेशिक स्टारचे स्वप्न असते. बॉलिवूडमध्ये आल्यानंतरच संपूर्ण देश त्याला ओळखतो. अल्लू अर्जुनलाही एकदा बॉलिवूडमध्ये नशीब आजमावायचे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : या 6 राशींच्या नशिबात धनलाभाचे योग, कोणाला मिळणार आनंदाची बातमी? वाचा शनिवारचे राशीभविष्य

फायनान्स कंपन्यांची मुजोरी शेतकऱ्यांच्या मुळावर, हप्ते फेडण्यासाठी घर विकावं लागणार

SAAM MUSIC च्या नव्या भक्तिगीतातून त्र्यंबकेश्वर महादेवाची महिमा; शिवभक्तांसाठी भक्तीमय पर्वणी|VIDEO

बँकांमध्ये तुमचे पैसे सुरक्षित नाही; PNB बँकेतून सुमारे 35 कोटी गायब

ठाकरे-फडणवीस एकत्र येणार? पुढच्या पाच महिन्यात राजकीय भूकंप?

SCROLL FOR NEXT