(सचिन गाड)
सायबर फ्रॉडच्या घटना दररोज घडत आहेत. सायबर फ्रॉडमध्ये कोणी फसवू नये, यासाठी सरकारकडून वेळोवेळी अलर्ट दिला जातो. तरीही अनेकजण याचा शिकार होत असतात. सामान्य नागरिकचं नाही तर मोठं-मोठे व्यावसायिक आणि बॉलिवूडस्टार देखील सायबर फ्रॉडमध्ये फसून लाखो रुपये गमावून बसत आहेत. अभिनेता अफताब शिवदसानीही सायबर फ्रॉडचा शिकार झालाय. (Latest News)
याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, ही घटना रविवारी घडली आणि आज या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. बॉलिवूड अभिनेता अफताब शिवदसानी सायबर गंडा घालण्यात आलाय. अफताबने १ लाख ४९ हजार ९९९ रुपये गमावले आहेत. अफताबला मोबाईल एक मेसेज आला होता. त्यात तुमचं बँक खाते निलंबित होणार आहे. ते बँक खाते चालू ठेवण्यासाठी एका खासगी बँकेच्यी केवायसी करण्यासाठी त्याची काही माहिती मागितली. अभिनेता अफताबने मेसेजवर सर्व माहिती दिली. त्यानंतर खात्यातून पैसे काढल्याचा मेसेज आला.
अभिनेता अफताब शिवदसानीला एक लिंक मेसेजवर आली होती. त्यावर त्याने क्लिक करताच त्याला एक कॉल आला. कॉलवर बोलणाऱ्या व्यक्तीने आफताबला बँकेच्या पेजवर त्याचा मोबाईल नंबर आणि पिन नंबर टाकण्याची विनंती केली. त्यानंतर आफताबने सर्व तपशील भरले. यानंतर आफताबच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ४९ हजार रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आला. त्यानंतर अफताबने बँकेच्या शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधला आणि त्यांच्या सल्ल्यानुसार त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ४२० (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.