Actor Death News x
मनोरंजन बातम्या

Actor Shot Dead : लोकप्रिय अभिनेत्याची गोळ्या झाडून हत्या, पीडित महिलेच्या मदतीसाठी गेल्यानं गमावला जीव

Actor Death : ट्रॅफिक सिग्नलवर सुरु असलेल्या वादामध्ये अभिनेता मध्ये पडला. त्याने पीडित महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अभिनेत्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यात अभिनेत्याचा मृत्यू झाला.

Yash Shirke
  • महिलेला मदत करण्यासाठी गेलेल्या अभिनेत्याचा मृत्यू

  • महिलेला त्रास देणाऱ्या व्यक्तीने अभिनेत्यावर झाडल्या गोळ्या

  • गोळीबारामध्ये अभिनेत्याचा जागीच मृत्यू

Crime : मनोरंजन विश्वातून धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये झालेल्या गोळीबारात अभिनेता अ‍ॅडम टर्कचा मृत्यू झाला आहे. अ‍ॅडम हा एका पीडितेला मदत करण्याच्या प्रयत्नात मारला गेला. पीडितेचा घरगुती छळ करणाऱ्या व्यक्तीने अ‍ॅडमची गोळ्या घालून हत्या केली. स्थानिक वृत्तवाहिनीला अ‍ॅडम टर्कचे मित्र आणि कुटुंबीयांनी ही माहिती दिली.

३५ वर्षीय अ‍ॅडम टर्क हा व्हर्जनियाच्या रिचमंड येथील थिएटर सोसायटीमध्ये सक्रीय होता. चित्रपटांपेक्षा नाटकांमध्ये त्याने जास्त काम केले. याशिवाय तो सामाजिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होत असे. शनिवारी (२ ऑगस्ट) एका पीडितेला मदत करण्यासाठी अ‍ॅडम ट्रॅफिक स्टॅडवर थांबला होता. पीडितेचा छळ करणाऱ्याने त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये अ‍ॅडमचा मृत्यू झाला.

अ‍ॅडम हा मूळचा पेनसिल्व्हेनियाचा रहिवासी होता. त्याने रिचमंडच्या थिएटर सोसायटीमध्ये दशकाहून अधिक काळ काम केले होते. तो लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होता. व्हर्जिनिया थिएटर मशीनच्या वेबसाइटवरील त्याच्या प्रोफाइलनुसार, अ‍ॅडम टर्कने मॉस्को आर्ट थिएटरमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. अमेरिकेतील सर्वात जुन्या थिएटर कंपनीसोबत, नॅशनल थिएटरसोबत त्याने तीन वर्षे टूरिंग केली होती.

२०१८ मध्ये अ‍ॅडम टर्कने 'हँड टू गॉड' साठी RTCC पुरस्कार जिंकला होता. या नाटकामध्ये त्याने जेसन आणि टायरोन अशा दोन भूमिका साकारल्या होत्या. रिचमंड ट्रँगल प्लेयर्स या कंपनीसह 'लारामी प्रोजेक्ट' आणि 'द इनहेरिटन्स', रिचमंड शेक्स या कंपनीसह 'रोझेनक्रांत्झ अँड गिल्डनस्टर्न आर डेड' आणि 'स्कूल फॉर लाईज' आणि फायरहाऊस थिएटर कंपनीसोबत 'अ‍ॅनिमल कंट्रोल' अशा प्रोजेक्टमध्ये अ‍ॅडमने काम केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT