
सलमान खानचा बॉडीगार्ड शेरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
शेराच्या वडिलांचे, सुंदर सिंह जॉली यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे.
सुंदर सिंह दीर्घकाळापासून कॅन्सरशी लढा देत होते.
Shera : सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या वडिलांचे निधन झाले आहे. शेराचे मूळ नाव गुरमीत सिंह जॉली असे आहे आणि त्याच्या वडिलांचे नाव सुंदर सिंह जॉली असे आहे. ते कर्करोग आजाराने ग्रस्त होते. या आजाराशी दीर्घकाळ झुंज दिल्यानंतर आज (७ ऑगस्ट) त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८८ व्या वर्षी सुंदर सिंह जॉली यांचे निधन झाले.
वडिलांच्या निधनानंतर शेराने एक अधिकृत निवेदन शेअर केले. या निवेदनाद्वारे त्याने सर्वांना वडिलांच्या निधनाची माहिती दिली. लोखंडवाला बॅक रोड, ओशिवरा, अंधेरी पश्चिम येथून दुपारी चार वाजता शेराच्या वडिलांची सुंदर सिंह जॉली यांची अंतिम यात्रा निघणार असल्याचे अधिकृत निवेदनामध्ये म्हटले होते.
शेराचे वडील, सुंदर सिंह यांनी काही महिन्यांपूर्वी ८८ वा वाढदिवस साजरा केला होता. वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेराने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. 'माझ्या आयुष्यातील वीर, माझे प्रेरणास्थान बाबा तुम्हाला ८८व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! माझ्या अंगी असलेली प्रत्येक ताकद तुमच्याच संस्कारांतून आणि प्रेमातून आलेली आहे. बाबा, तुमच्यावर मनापासून प्रेम करतो!' असे कॅप्शन शेराने पोस्टला दिले होते.
शेरा हा बॉलिवूड चाहत्यांसाठी परिचित व्यक्ती आहे. १९९५ पासून तो सलमान खानचा विश्वासू अंगरक्षक म्हणून काम करत आहे. त्याचे खरे नाव गुरमीत सिंह जॉली आहे, जे फार कमी लोकांना माहीत आहे. त्याला शेरा या टोपणनावाने सर्वजण ओळखतात. शेरा हा सेलिब्रिटींसाठी सिक्युसिटी फर्म 'टायगर सिक्युसिटी' चालवतो. या फर्ममधून अनेक सेलिब्रिटींना सिक्युसिटी दिली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.