abhijeet bichukale saam tv
मनोरंजन बातम्या

Abhijeet Bichukale: पत्नीला पहिली महिला मुख्यमंत्री करणार, राज्याला माझ्याशिवाय पर्याय नाही; अभिजित बिचुकलेंचा गजब दावा...

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले नेहमी काही तरी वादग्रस्त विधानांनी नेटकऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असतो.

Chetan Bodke

Abhijeet Bichukale: बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले नेहमी काही तरी वादग्रस्त विधानांनी नेटकऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असतो. नेहमी प्रमाणे वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेला अभिजीत सध्या एका विधानामुळे कमालीचा चर्चेत आला आहे. शाहरुखच्या 'पठान' चित्रपटातील असलेल्या लूकवर अभिजित बिचुकलेने वक्तव्य केले होते.

'पठानमध्ये शाहरुखने केलेला लूक माझ्यासारखाच आहे.' या विधानामुळे सर्वांनाच हसू आवरेनासे झाले होते. आता पुन्हा एकदा एक गजब वक्तव्य करत त्याने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होणार यावर त्याने भाष्य केले आहे. महाराष्ट्राला अद्याप तरी महिला मुख्यमंत्री मिळालेल्या नाहीत, त्यामुळे त्याच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अभिजित बिचुकलेने स्वत: राज्याचे मुख्यमंत्री होण्यापासून ते राष्ट्रपती होण्यापर्यंतचे स्वप्न पाहिले होते, त्यावेळी त्याची सोशल मीडियावरही बरीच चर्चा झाली होती. या स्वप्नाचे काहींनी कौतुक केले तर काहींनी ट्रोल केले. स्वत:चे स्वप्न पत्नीच्या माध्यमातून पुर्ण करण्याचा बिचुकलेचा विचार आहे.

त्याच्या पत्नीला राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनवण्याचा विडा आता त्याने उचलला आहे. सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकाही महिलेला मंत्रीमंडळात स्थान मिळाले नसल्याने बिचुकले यांनी महिला मुख्यमंत्री पदाचा उचललेला मुद्दा महिलांच्या सन्मानाच्या दृष्टीने चांगलाच चर्चेत आला आहे.

नुकताच त्याच्या पत्नीचा वाढदिवस झाला. पत्नीला त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपल्या मनातल्या भावना त्याने त्यात मांडल्या. त्याच्या पत्राचं शिर्षक होतं 'महाराष्ट्राच्या पहिल्या भावी मुख्यमंत्री'

पत्रकारांशी बोलताना अभिजित बिचुकले म्हणतो, " सर्वात प्रथम मी हे बोललेलो नाही. ज्यावेळी आमच्या सौभाग्यवतींनी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात पहिल्यांदा निवडणूक लढवली होती, तेव्हा मी साताऱ्याच्या पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले होते." सोबतच स्वातंत्र्य मिळाल्यापासून राजकारणात सर्वाधिक पुरुषांचीच मक्तेदारी राहिली असंही त्यांनी सांगितले.

सोबतच पुढे अभिजित बिचुकले म्हणतो, “मुख्यमंत्रीपदी जी महिला पाहिजे तिला भारतीय संस्कृतीचं संपूर्ण ज्ञान पाहिजे. संपूर्ण भारतात ती संस्कृती जपणारी आणि पळणारी घरंदाज स्त्री पाहिजे, आणि माझी पत्नी अलंकृता बिचुकले ही महाराष्ट्राचं सौंदर्य, संस्कृती आणि मानसन्मान जपणारी स्त्री आहे. मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाताना हा मुद्दा मांडणार आहे.”

शिवाय आत्तापर्यंत बऱ्याच नेत्यांनी महाराष्ट्राला लुटलं आहे असा आरोपदेखील त्यांनी केला आहे. याबरोबरच “सध्या महाराष्ट्राला माझ्याशिवाय पर्याय नाही.” असंही बिचुकलेने वक्तव्य केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election : २ आमदारासह २७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी, बिहारमध्ये वातावरण तापलं

Maharashtra Politics: नंदुरबारमध्ये भाजपची ताकद वाढणार, हिना गावित यांची आज घरवापसी

Maharashtra Live News Update: मोंथा चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट

Heart blockage: मान किंवा जबड्यामध्ये वेदना होतायत? हृदयाच्या धमन्या ब्लॉक होण्यापूर्वी पाहा कोणते 5 संकेत मिळतात

Nilesh Sable : निलेश साबळेचा नवाकोरा शो; लाडक्या वहिनींसाठी भन्नाट गिफ्ट, नावही आहे खास

SCROLL FOR NEXT