Abhijeet Deshpande Director of Har Har Mahadev Movie Press Conference Saam Tv
मनोरंजन बातम्या

Har Har Mahadev: 'हर हर महादेव'ला विरोध, ठाण्यात राडा, शो बंद; दिग्दर्शक अभिजीत देशपांडे पहिल्यांदाच बोलले...

हर हर महादेव हा चित्रपट बघत असताना एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली, याचा निषेध चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Har Har Mahadev Movie Controversy: हर हर महादेव हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अमोल मिटकरी, संभाजी राजे आणि जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. या विरोधाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. काल ठाण्यातील विवियाना मॉल येथे हर हर महादेव हा चित्रपट बघत असताना एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली आहे. याचा निषेध करण्यासाठी हर हर महादेव चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

काय म्हणाले हर हर महादेव चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे?

या चित्रपटावर ज्या ज्या मुद्द्यांवरून आक्षेप घेतला जात आहे तेच मुद्दे आम्हाला सेन्सर बोर्डाने विचारले होते. त्याबाबतचे सगळे ऐतिहासिक पुरावे आणि दस्तावेज आम्ही सेन्सर बोर्डला सादर केल्यानंतरच आम्हाला प्रमाणपत्र मिळाले आहे.

काल एक फार लांछनास्पद प्रकार घडला. चित्रपटगृहांमध्ये घुसून काही लोकांनी चित्रपट पाहायला आलेल्या एका मराठी प्रक्षेकाला मारहाण करण्यात आली आहे. त्यांना शिवीगाळ करण्यात आली तसेच त्यांचे कपडे फाडण्यात आले आहेत. त्यामुळे मला वाटले की समोर येऊन आमचा मुद्दा मांडावा. मी या घडलेल्या प्रकरणाचा निषेध करतो.

आपण जर स्वःताला शिवरायांचे भक्त म्हणवतो आणि आपण त्यांचेच विचार समजून न घेता एकमेकांवर असे वार-प्रतीवर, हल्ले शिवीगाळ करत राहिलो तर कुठे नेऊन ठेवणार आहोत आपण महाराष्ट्र.

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन हे केंद्र सरकारचे मंडळ आहे. यामध्ये तज्ञ लोकांचा समावेश आहे. ऐतिहासिक चित्रपटांच्या वेळी तिथे इतिहासकार सुद्धा असतात. त्यांना आम्ही सगळे मुद्दे पटवून सांगितले आहेत, त्याचे पुरावे साधार केले आहेत त्यानंतरचा आम्हाला प्रमाणपत्र मिळाले आणि चित्रपट प्रदर्शित झाला आहे. (Movie)

आपण अशा इतिहासकरांविषया बोलत आहोत ज्यांनी त्याचे संपूर्ण आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासण्यात घालवले आहे. त्यांच्या पुस्तकांचा आधार घेऊनच आम्ही चित्रपट बनविला आहे. १९०६ मध्ये केळुस्करांच्या एका पुस्तकामध्ये काही गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्याच गोष्टी चित्रपटामध्ये आम्ही दाखविल्या आहेत. तुम्हाला चित्रपटातील कोणता भाग पटला किंवा नाही पटला यावर आपण कोर्टात बोलू. (Press Conference)

शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र आणले होते. सगळ्यांना माणुसकीचा संदेश दिला होता. त्याच महाराष्ट्रात एका कुटुंब प्रमुखाला त्याच्या कुटुंबासोमर मारहाण केली जाते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण किती अपमान करत आहोत. त्यासाठी ह्या सगळ्या लोकांनी महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना E-KYC अनिवार्य, कुठे अन् कसं करायचं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Maharashtra Live News Update: जालन्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, 997 घरांसह 105 दुकानांमध्ये शिरले पावसाचे पाणी

Maharashtra Rain: पुढील ३ तासांत १४ जिल्ह्यात मुसळधार पाऊस; मुंबई, पुण्यासह नाशिकला झोडपणार, वाचा हवामानाचा अंदाज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो हे काम करा, अन्यथा ₹ १५०० बंद होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Jio Recharge Plan: जिओ 209 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; ग्राहकांना मिळणार डेटा, कॉलिंग अन् बरंच काही..., वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT