Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : आर्याने निक्कीचा गाल केला लाल, लगावली कानशिलात;'बिग बॉस' कोणती शिक्षा ठोठावणार?

Nikki Tamboli-Aarya jadhav Fight : बिग बॉसच्या घरातील भांडणांनी हिंसेचे रूप घेतलं आहे. अरबाज आणि संग्रामनंतर आता आर्या आणि निक्कीमध्ये मोठा राडा पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) घरात रोज एक नवीन राडा पाहायला मिळत आहे. कॅप्टन्सी टास्क चांगलाच रंगला आहे. आज पुन्हा एकदा निक्की (Nikki Tamboli) आणि आर्या (Aarya jadhav) मध्ये वाद निमार्ण झाला आहे. या वादाने पुढे जाऊन हिंसेचे रूप घेतले आहे. चालू असलेला कॅप्टन्सी टास्क 'टीम ए' विरुद्ध 'टीम बी' असा खेळला जात आहे. यावेळी आर्या आणि निक्कीमध्ये भांडण होते आणि यातून आर्या निक्कीला थोबाडीत मारते.

या टास्कमध्ये स्टोनच संरक्षण करताना अंकिता, वर्षा आर्या, निक्की आणि जान्हवी वॉशरुममध्ये पाहायला मिळाले. निक्कीच्या हातात हा स्टोन येऊ नये म्हणून सर्वजण प्रयत्न करत होते. त्यात आर्या निक्कीचे हात धरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

निक्की आणि आर्याचे भांडण झटापटीत रूपांतरीत होऊन आर्या निक्कीला थोबाडीत मारते. त्यानंतर निक्की आरडाओरडा करत बाहेर येते आणि 'बिग बॉस'ला सांगत की, "आर्याने मला मारलंय, मी हे सहन करू शकत नाही. एकतर मला बाहेर काढा नाहीतर तिला. असे निक्की बोलते. यावर निक्की संतापून म्हणते की, "मला काही घेणं देणं नाही, मला जेल मध्ये पाठवा नाहीतर घरी पाठवलं तरी चालेल".

बिग बॉसच्या घरात असे पहिल्यांदाच झाले असल्यामुळे आर्याचे पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये बिग बॉस आर्याला शिक्षा सुनावरणार आहे. बिग बॉस घरातील या राड्यावर संचालक आणि बिग बॉस काय निर्णय घेणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. तसेच या आठवड्याच भाऊच्या धक्क्यावर काय पाहायला मिळणार हे देखील पाहणे रोचक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : विजयी मेळावा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

SCROLL FOR NEXT