Parineeti Raghav Engagement Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti Raghav Engagement: परिणीती- राघवच्या साखरपुड्यावर EDचं विघ्न?; कारण...

अनेकदा यांच्या साखरपुड्याची चर्चा झाल्या नंतर आता पुन्हा एकदा ही जोडी साखरपुडा करणार असल्याची चर्चा होत आहे. पण यांच्या साखरपुड्यावर आता ईडीने पाणी फिरवलं आहे.

Chetan Bodke

Parineeti Raghav Engagement: गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवुड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांच्या रिलेशनची चर्चा बरीच झाली आहे. सोबतच मीडियाच्या कॅमेऱ्यात डिनर डेट ला जाताना सुद्धा ही जोडी अनेकदा दिसली होती. अनेकदा यांच्या साखरपुड्याची चर्चा झाल्या नंतर आता पुन्हा एकदा ही जोडी साखरपुडा करणार असल्याची चर्चा होत आहे. पण यांच्या साखरपुड्यावर आता ईडीने पाणी फिरवलं आहे.

खासदार राघव चड्ढा यांचे ईडीच्या पुरवणी आरोपपत्रात नाव आले असून त्यांचे आरोपपत्रात आरोपी म्हणून नाव घेण्यात आलेले नाही. आरोपपत्रात राघव चड्ढा यांच्या फक्त नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याच साखरपुड्यात स्वतः खासदार राघव चड्ढा हजर राहणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Eenforcement Directorate)

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, परिणीती आणि राघव १३ मे रोजी साखरपुडा करणार आहेत. त्यांचा साखरपुडा नवी दिल्लीत होणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. परी आणि राघव हे दोघेही होणाऱ्या चर्चांवर काहीच बोलत नव्हते. अनेकदा सोशल मीडियावर त्या दोघांचेही एकत्र फोटो व्हायरल झाले होते. अनेकदा परिणीतीला पापाराझींनी त्यांच्या रिलेशनवर प्रश्न विचारले होते. ती माध्यमांसमोर त्यांच्या प्रश्नांना टाळण्याचा प्रयत्न करते पण तिच्या चेहेऱ्यावरील स्मितहास्यच सर्व काही उत्तर देऊन जात होते.

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी दोघांनी ही दिल्लीत साखरपुडा आटोपला असून येत्या ऑक्टोबर महिन्यात लगीनगाठ बांधणार असल्याची चर्चा झाली होती. आता पर्यंत जितक्या त्यांच्या लग्नाच्या चर्चा झाल्या होत्या, त्या सर्व फोल ठरल्या होत्या.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या रिलेशनच्या चर्चांना मार्च महिन्यापासून सुरुवात झाली होती. दोघेही मुंबईतील एका हॉटेलमध्ये डिनरसाठी गेले असताना ते कॅमेऱ्यासमोर स्पॉट झाले होते. गेल्या महिन्यात अनेकदा परिणीतीने दिल्लीवारी देखील केली होती. त्यावेळी ते दिल्ली एयरपोर्टवर एकत्र स्पॉट झाले होते.

परिणीती चोप्राच्या सिनेकारकिर्दीबद्दल बोलायचे तर, तिने रणवीर सिंगसोबत लेडीज वर्सेस रिकी बहल या चित्रपटातून चित्रपटांमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, परिणीतीचा शेवटचा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्यासोबत होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला असून आता परिणीती 'चमकिला' आणि 'कॅप्सूल गिल' या खऱ्या आयुष्यावरील कथांवर आधारित दोन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा लढा, नेतृत्वावर घसरला? बीडच्या सभेत भुजबळांकडून लाव रे तो व्हिडीओ

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

SCROLL FOR NEXT