Aamir Khan and Gauri Spratt relationship Sister Nikhat Reaction Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aamir Khan: ६० वर्षांचा आमिर अन् ४६ वर्षांची गौरी; या कपालच्या डेटिंगबद्दल बहीण म्हणाली, 'ती खूप...'

Aamir Khan and Gauri Spratt: सध्या सगळीकडे आमिर खान आणि गौरी स्प्राटच्या डेटिंगची चर्चा सुरु आहे. त्यात आता आमिरची बहीण निखत खानने तिच्या भावाच्या अफेअरबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

Shruti Vilas Kadam

Aamir Khan and Gauri Spratt: आमिर खानने अलीकडेच त्याची मैत्रीण गौरी स्प्राटची जगासमोर ओळख करून दिली, जिच्यासोबत तो त्याच्या आयुष्यातील सुंदर क्षण घालवत आहे. अलिकडेच आमिरची बहीण निखत खानने तिच्या भावाच्या अफेअरबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्याची नवीन प्रेयसी गौरी कशी आहे हे देखील सांगितले आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान सध्या त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. दोनदा घटस्फोट झालेला हा अभिनेता पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. होळीच्या निमित्ताने त्याने एका महिलेला डेट करत असल्याचे उघड केले होते. त्याने पापाराझींसोबत एक बैठकही आयोजित केली पण त्यांना व्हिडिओ आणि फोटो काढू दिले नाहीत. आमिर खानने त्याच्या नवीन प्रेयसीबद्दल खुलासा केल्यापासून ती चर्चेत आहे. वयाच्या ६० व्या वर्षी त्याच्या प्रेमसंबंधावर अभिनेत्याच्या कुटुंबाची प्रतिक्रिया कशी आहे? आमिरची बहीण निखतने याचा खुलासा केला आहे.

आमिरच्या बहिणीने गौरीबद्दल काय म्हटले?

चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवणाऱ्या निखत खानने आमिर खानच्या अफेअर आणि त्याच्या नवीन प्रेयसीवर प्रतिक्रिया दिली आहे. अलीकडेच, निखत तिच्या आगामी मल्याळम चित्रपट 'L2: Empuraan' च्या ट्रेलर लाँचला उपस्थित राहिली. यादरम्यान, जेव्हा तिला आमिरच्या नवीन प्रेयसीबद्दल विचारण्यात आले तेव्हा निखत म्हणाली, "आम्ही आमिर आणि गौरीसाठी खूप आनंदी आहोत कारण ती खूप चांगली व्यक्ती आहे आणि आम्हाला वाटते की त्यांनी कायमचे आनंदी राहावे."

आमिर गौरी स्प्रेटला कधीपासून ओळखतो

होळीच्या निमित्ताने आमिर खानने त्याच्या प्रेयसीची ओळख करून दिली आणि सांगितले की ती बेंगळुरूची रहिवासी आहे. आमिर गेल्या २५ वर्षांपासून गौरी स्प्रेटला ओळखत होता, पण काही कारणास्तव दोघेही संपर्कात नव्हते. पण ते २ वर्षांपूर्वी पुन्हा भेटले आणि दीड वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. गौरीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर ती आमिरच्या निर्मिती कंपनीत काम करते. ती आधीच घटस्फोटित आहे आणि एका मुलाची आई आहे.

आमिरचा दोनदा घटस्फोट झाला आहे.

आमिर खानबद्दल बोलायचे झाले तर त्याने दोनदा लग्न केले आहे. त्याचे पहिले लग्न १९८६ मध्ये रीना दत्तासोबत झाले होते आणि २००२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००५ मध्ये त्यांनी किरण रावशी लग्न केले. किरण आणि आमिरचा २०२१ मध्ये घटस्फोट झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT