Aamir Khan And Vishnu Vishal Stuck In Chennai Cyclone Michaung Twitter
मनोरंजन बातम्या

Aamir Khan Stuck In Chennai Cyclone Michaung: ‘मिचौंग’ चक्रीवादळाच्या पुरात आमिरसोबत अडकला टॉलिवूड अभिनेता, बचावपथकाने असा वाचवला दोघांचा जीव

Chennai Cyclone Michaung News: चेन्नईमध्ये आलेल्या ‘मिचौंग’ चक्रीवादळाचा फटका फक्त सामान्य नागरिकांनाच नाही तर, काही सेलिब्रिटींनाही बसला आहे. अडकलेल्या दोन सेलिब्रिटींचा बचावपथकाने जीव वाचवला आहे.

Chetan Bodke

Aamir Khan And Vishnu Vishal Stuck In Chennai Cyclone Michaung

‘मिचौंग’ चक्रीवादळामुळे चेन्नईतल्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. या चक्रीवादळामुळे तेथील नागरिकांचे जनजीवन ठप्प झाले आहेत. बदललेल्या हवामानाचा चेन्नईसह आजुबाजुच्या जिल्ह्यांनाही फार मोठा फटका बसला आहे. या ‘मिचौंग’ या चक्रीवादळामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.

खरंतर, या चक्रीवादळाचा फटका फक्त सामान्य नागरिकांनाच नाही तर, काही सेलिब्रिटींनाही बसला आहे. चेन्नईच्या ‘मिचौंग’ चक्रीवादळाचा फटका बॉलिवूड अभिनेता आमिर खान सुद्धा अडकला आहे. या पुरामध्ये, आमिर खानसोबत विष्णु विशाल सुद्धा अडकला होता. त्यांच्या मदतीला काही रेस्क्यू टीम आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टॉलिवूड अभिनेता विष्णू विशाल आणि बॉलिवूड अभिनेता आमिर खान ‘मिचौंग’ चक्रीवादळामुळे आलेल्या पुरामध्ये चेन्नईच्या करापक्कममध्ये अडकले होते. विष्णू विशालने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर)वर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्याने त्याच्या घरातही पुराचे पाणी शिरल्याचा खुलासा केला होता. त्यामुळे घरात लाईट आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे तो खूप मोठ्या संकटामध्ये, सापडल्याचे स्पष्ट केले. (Latest Marathi News)

त्याने आपल्या ट्वीटमध्ये सांगितले की, “माझ्या घरामध्ये पाणी शिरलं आहे. चेन्नईतल्या करपक्कममधील माझ्या घरामध्ये आणि परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढत आहे. मी मदतीसाठी फोन केला आहे. वीज नाही, इंटरनेट नाही, फोनला नेटवर्क नाही. फक्त टेरेसवर एका विशिष्ट ठिकाणी मला थोडंसं नेटवर्क मिळेल, अशी आशा. मोबाईलला नेटवर्क आलं तर येथील लोकांना काहीतरी मदत मिळेल. मला चेन्नईतल्या लोकांची फार काळजी वाटते. #staystrong.” असं त्याने आपल्या पोस्टमध्ये नमुद केलं आहे. (Actor)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर)वर मदत मागितल्यानंतर त्याची सुटका झाली आहे. सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी बोटी तैनात करण्यात आल्याचे दोन फोटो त्यांनी शेअर केले आहेत. विशालने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, आमिर खान देखील दिसत आहे. अमिर खान नेमका कोणत्या परिसरामध्ये अडकला होता?, हे कळू शकलेलं नाही. अग्निशमन आणि बचाव विभागाने मदत केल्यानंतर विष्णू विशालने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर)वर एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये विष्णू विशालसोबत आमिर खान देखील दिसत आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT