Sitaare Zameen Par SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sitaare Zameen Par : तारीख ठरली! आमिर खानचा 'सितारे जमीन पर' युट्यूबवर, किती रुपयांत पाहता येणार?

Sitaare Zameen Par On Youtube : आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाची युट्यूब रिलीज डेट समोर आली आहे. चित्रपट किती रुपयांत पाहायला मिळणार जाणून घेऊयात.

Shreya Maskar

आमिर खानचा 'सितारे जमीन पर' चित्रपट थिएटर गाजवल्यावर आता युट्यूबवर पाहता येणार आहे.

'सितारे जमीन पर' हा चित्रपट 20 जूनला रिलीज झाला.

'सितारे जमीन पर'मध्ये आमिर खानसोबत जिनिलिया देखील झळकली आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अलिकडेच त्याचा 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली आहे. आता आमिर खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 'सितारे जमीन पर' आता तुम्हाला लवकरच घरबसल्या पाहाता येणार आहे. आमिर खानने घेतलेल्या मोठ्या निर्णयानुसार 'सितारे जमीन पर' ओटीटीवर रिलीज होणार नसून तो युट्यूबवर पाहता येणार आहे.

'सितारे जमीन पर' युट्यूब रिलीज डेट

'सितारे जमीन पर'च्या युट्यूब रिलीजचे अपडेट समोर आले आहेत. आमिर खानचा 'सितारे जमीन पर' चित्रपट यूट्यूब मूव्हीज ऑन डिमांडवर प्रदर्शित करण्याचा निर्णय चाहत्यांना खूप आवडला. चित्रपट कोणत्याही इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार नाही. मीडिया रिपोर्टनुसार, 'सितारे जमीन पर' चित्रपट 1 ऑगस्टपासून युट्यूबवर पाहता येणार आहे. फक्त 100 रुपये याचे शुल्क असणार आहे. तसेच इतर 38 देशांमध्ये त्यांच्या स्थानिक किंमतीसह चित्रपट पाहता येणार आहे. उदा. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी

'सितारे जमीन पर' कलेक्शन

'सितारे जमीन पर' चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'सितारे जमीन पर'हा चित्रपट 20 जूनला रिलीज झाला आहे. हा चित्रपट शिक्षक आणि मुलांच्या नात्यावर आधारित आहे. चित्रपटात आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहे.'सितारे जमीन पर'मध्ये आमिर खानसोबत जिनिलिया देखील झळकली आहे. सितारे जमीन पर' हा चित्रपट 2007 साली रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सीक्वल आहे.'सितारे जमीन पर' चित्रपटाने जगभरात 250 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

'सितारे जमीन पर' स्टारकास्ट

'सितारे जमीन पर' चित्रपटात 10 नवीन कलाकार पाहायला मिळत आहेत. यात अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचा समावेश आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटासाठी चांगला प्रतिसाद येत आहे.

'सितारे जमीन पर' कधी रिलीज झाला?

20 जून

'सितारे जमीन पर' युट्यूबवर कधी रिलीज होणार?

1 ऑगस्ट

'सितारे जमीन पर'चं कलेक्शन किती?

250 कोटींहून अधिक

'सितारे जमीन पर' युट्यूबवर किती रुपयांत पाहता येणार?

100 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politcs : कुछ बडा होने वाला है! दिल्लीत महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला, पडद्यामागं काय घडतंय? VIDEO

Unnao Hit-and-Run: आमदाराच्या कारनं दुचाकीस्वाराला उडवलं; रेल्वे पुलावरून खाली कोसळून भाजप नेत्याच्या भावाचा मृत्यू

Shocking : धक्कादायक! एम्समधील नर्सच्या दोन चिमुकल्यांना घरात जिवंत जाळलं; आईनं हंबरडा फोडला

Maharashtra Live News Update: एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक, सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त

SCROLL FOR NEXT