जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये सर्वाधिक चित्रपट दरवर्षी तयार केले जातात. जवळपास १४४ कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या भारताची आहे. मात्र यापैकी अवघे ४ टक्के लोकच चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहतात. त्यामुळे प्रत्येक चित्रपट भारतीय नागरिकापर्यंत पोहोचत नाही. चित्रपट घराघरात प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता अभिनेता आमिर खानने मोठी घोषणा केली आहे.
युट्यूबसोबत पार्टनरशिप करत आमिर खान प्रोडक्शनच्या माध्यमातून निर्मिती झालेले सर्वच चित्रपट यापुढे युट्यूबवर पाहायला मिळणार असून अवघ्या १०० रुपयांत अभिनेता आमिर खानचा तुमच्या आवडीचा चित्रपट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 'आमिर खान टॉकीज जनता का थिएटर'च्या माध्यमातून १ ऑगस्टपासून अवघ्या १०० रुपयांत घरबसल्या तुम्हाला सहकुटुंब हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. 'सितारे जमीन पर' हा आमिर खानचा चित्रपट १ ऑगस्टपासून युट्यूबवर पाहायला मिळणार आहे अशी घोषणा आमिर खानने आज केली.
मुंबईच्या वांद्रे ताजलँड हॉटेलमध्ये युट्युबचे भारतातील मॅनेजिंग डायरेक्टर गुंजन सिंह आणि आमिर खान यांच्यात एक करार झाला. युट्यूबकडून भारतीय चित्रपटांना रेड कार्पेट देण्याची घोषणा देखील आज गुंजन सिंह यांनी केली. यावेळी आमिर खानने सांगितले की, 'देशाची लोकसंख्या १४५ कोटी आहे मात्र अवघे ३ ते ४ टक्के लोकांपर्यंतच चित्रपट पोहचतो. सुरुवातीला चित्रपटाचे डब्बे आले, मग रीळ आल्या, नंतर कॅसेट, पुढे सीडी आणि नंतर पेन ड्राईव्ह आले. भारतीय लोक देखील मोबाईलच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट करत आहेत लोक सर्वाधिक मोबाईल वापरत आहेत. युट्युबचाही वापर देशातील ५५ कोटी पेक्षा अधिक लोक करत आहेत. यामुळे याचाच फायदा घेत आता आमिर खानकडून यूट्यूब चॅनलची घोषणा करण्यात आली आहे.
आमिर खानने सांगितले की, '१०० वर्षांपासून एकच मॉडेल आहे तिकीट खरेदी करतात आणि फिल्म बघतात. आमिर खान टॉकीज यू ट्यूबवर लाँच केलं. मी प्रत्येक भारतीयापर्यंत पोहचू असं स्वप्न होतं. जनता का थिएटर हे नाव दिलं. यू ट्यूब हेड यांना भेटलो. जगभराच्या तुलनेत भारतात फार कमी स्क्रीन आहेत. भारतात ८ ते ९ हजार स्क्रीन आहेत. अमेरिकेत ३५ हजार, चीन मध्ये ८० ते ९० हजार स्क्रीन आहेत. सिनेमा घर घर गाव गाव नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. स्मार्ट फोन आल्यावर जीवनशैली बदलली आहे. भारतात सर्वात जास्त चित्रपट तयार होतात. युवांना यामुळे संधी मिळत नाही. ही संधी त्यांना देणार आहे. यूट्यूबवर १०० रुपयांत चित्रपट रिलिज करणार आहे. यामुळं सर्व कुटुंब, नातेवाईक मित्रपरिवार यात बघू शकतात.'
आमिर खान प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून ज्या ज्या चित्रपटांची निर्मिती केली गेली ते सर्व चित्रपट टप्प्याटप्प्याने आमिर खान टॉकीज जनता का थिएटर या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. आमिर खानने उचललेले हे पाऊल चित्रपट घराघरात पोहोचवण्यास मदत करणार आहे. १ ऑगस् पासून 'सितारे जमीन पर' हा चित्रपट आमिर खानच्या यूट्यूब चॅनलवरती पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. मात्र त्यासाठी १०० रुपयांचे सबस्क्रीप्शन घ्यावे लागेल. जेणेकरून तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्वच व्यक्तींसोबत बसून हा चित्रपट पाहू शकता एकदा सबस्क्रीप्शन केल्यानंतर तो चित्रपट पूर्ण ३० दिवसांसाठी तुम्हाला युट्यूबवर पाहण्यासाठी उपलब्ध असणार असल्याचेही यावेळी आमिर खानने सांगितले.
या युट्यूब चॅनेलवर सुरुवातीला 'सितारे जमीन पर' हा चित्रपट अपलोड केला जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आमिर खानचे सर्व चित्रपट युट्यूबवर अपलोड केले जाणार आहेत. याशिवाय आमिर खानने केलेला 'सत्यमेव जयते' हा शो देखील युट्यूबवर पाहायला मिळणार असल्याचेही आमिर खानने यावेळी सांगितले. शिवाय आमिर खानचे वडील ताहिर हुसैन यांचे चित्रपट देखील या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर अपलोड केले जाणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.