Junaid Khan and Aamir Khan Saam TV
मनोरंजन बातम्या

Aamir Khan On Nepotism: 'मी १० ठिकाणी फोन करू शकलो असतो...' आमिर खानने सांगितला मुलाचा संघर्ष

Aamir Khan Son: आमिरने मुलगा जुनैद खानविषयी केलेल्या व्यक्तव्यामुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

Pooja Dange

Aamir Khan Spoke About Junaid Khan Struggle:

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टशनिस्ट आमिर खान नेहमीच चर्चेत असतो. दोन दिवसांपूर्वी आमिर खान मुंबई सोडून जाणार असल्यामुळे चर्चेत होते. आता आमिरने मुलगा जुनैद खानविषयी केलेल्या व्यक्तव्यामुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

बॉलिवूड कलाकारांसाठी नेपोटीज्म ठपका लागला आहे. नुकत्याच एका संभाषणात आमिरला नेपोटीज्मविषयी विचारण्यात आले. त्यावर माझ्या मुलाला देखील चित्रपटात काम मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला असल्याचे आमिरने सांगितले.

आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ताचा मुलगा जुनैद खान बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज आहे. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर जुनैदला यश राज फिल्मच्या चित्रपटामध्ये (Movie) काम करण्याची संधी मिळाली आहे. जुनैदने हे काम त्याच्या हिंमतीवर मिळवले आहे. आमिरने त्याला कोणतीही मदत केलेली नाही.

एबीपीशी संवाद साधताना आमिर खान म्हणलं म्हणाला की, 'हा नेपोटीज्म नसून मूर्खपणा आहे. तुम्ही अशा लोकांना घेत आहेत ज्यांना काम करायचे माहीत नाही आणि ज्यांना काम येत त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहात. मी त्याला नेपोटीज्म म्हणत नाही, याला मी निव्वळ मूर्खपणा म्हणणे.

आमिर खानने मुलगा जुनैदच्या संघर्षाविषयी बोलताना म्हणाला, 'माझ्या मुलाने आता त्याच्या पहिल्या चित्रपटाचे शॉटिंग पूर्ण केले आहे. त्याआधी तो १५ वेळा रिजेक्ट झाला होता. जुनैदने विविध ठिकाणी जाऊन अभिनय आणि थिएटरचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तो अनेक ठिकाणी काम मागण्यासाठी फिरला. माझ्याकडे त्याने काम मागितले नाही. ना मी त्याला काम देईन असे म्हणालो.'

तो कास्टिंग डायरेक्टरच्या ऑफिसबाहेर उभा राहून वाट बघत बसायचा. जेव्हा त्याला संधी मिळायची तो ऑडिशन द्यायचा. ऑडिशन दिल्यानंतर फेल व्हायचा. त्याला काम मिळत नव्हते. अखेर आता त्याला काम मिळाले आहे. माझ्या मुलसाठी मी १० ठिकाणी फोन करू शकतो असतो. पण माझी अशी समजूत आहे की, जर तुम्हाला काम येत असेल तर तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. जर तुम्हाला काम येत नसेल तर तुम्ही किहिती हात-पाय मारा काही होणार नाही.' (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT