Aamir Khan Shifting To Chennai Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aamir Khan Leaving Mumbai: आमिर खान सोडणार मुंबई, नेमकं काय आहे कारण?

Aamir Khan Big News: आमिर खान मुंबई सोडून जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

Pooja Dange

Aamir Khan Relocating In Chennai:

मिस्टर परफेशनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खानबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आमिर खान मुंबई सोडून जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

आमिर खान मुंबई सोडून चेन्नईला शिफ्ट होणार असल्याचे बोलले जात आहे. आमिर खान मुंबई सोडून जाणार हे ऐकून अनेकांना थोडा शॉक लागला आहे.

अभिनेता त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे मुंबई सोसून जात असल्याचे त्याच्या जिव्हाळ्याच्या सूत्रांनी सांगितले आहे. आमिरसाठी त्याचे कुटुंब खूप महत्त्वाचे आहे आणि कुटुंबाचाच त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

आमिर खानची आई जीनत हुसैन चैन्नईचाय एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. आमिर खानला आईसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. यासाठी तो चेन्नईत शिफ्ट होणार आहे.

आमिर खानच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमिर खान त्याची आई ज्या हॉस्पिटलमध्ये आहे त्याच्या जवळचा एका हॉटेलमध्ये राहणार आहे. आमिर खान फक्त दोन महिन्यासाठीच चेन्नईला शिफ्ट होणार आहे.

आमिर खान त्याच्या एक मुलाखतीत सांगितले होते की त्याच्यासाठी त्याचे कुटुंब खूप महत्त्वाचे आहे. तसेच तो म्हणाला होता, 'कामामुळे कुटुंबाला इतकी वर्षे वेळ देता आला नाही. त्यामुळे आता जास्तीस्त जास्त वेळ कुटुंबासोबत घालविण्याचा प्रयत्न मी करत आहे.'

आमिर खानने 'लाला सिंग चड्ढा' हा चित्रपट बॉक्स ऑफिस फ्लॉप झाल्यानंतर अभिनयातून ब्रेक घेतला आहे. आमिर खान आता सनी देओल अभिनीत आणि राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'लाहोर १९४७'ची निर्मिती करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silver Wearing Rules: 'या' ३ राशींसाठी चांदी आहे घातक; नशिबी येते दारिद्रय, 'राजाचा होतो रंक'

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर थेट घरात आणि हॉटेलमध्ये घुसली कार

Frequent urination: दिवसातून किती वेळा लघवीला जाणं नॉर्मल आहे?

धक्कादायक! रिव्हॉल्व्हर साफ करताना गोळी सुटली; पोलीस उपअधीक्षक योगेश यांचा मृत्यू, पोलीस दलात खळबळ

Sunetra Pawar: अजितदादांच्या निधनाबद्दल माझ्या मनात शंका: सुनेत्रा पवार

SCROLL FOR NEXT