Ira Khan's Engagement: Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ira-Nupur Engagement Video: आमिरच्या लेकीने एंगेजमेंटला महत्वाच्या लोकांनाच दिले स्थान, व्हिडिओ शेअर करत दिले स्पष्टीकरण

आयराच्या एंगेजमेंटचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ira Khan Shares Unseen: बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानचा 18 नोव्हेंबर रोजी साखरपुडा पार पडला. आयराचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी साखरपुडा झाल्यानंतर त्या कार्यक्रमाची चर्चेत होत आहे. आयराच्या एंगेजमेंटचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. दरम्यान,इंस्टाग्रामवर तिच्या पार्टीचा आणखी एक व्हिडिओ आयराने शेअर केला आहे. आयराने या कार्यक्रमात कमी लोकांना बोलावयाचे सांगितले आहे. तसेच तिने तिच्या एंगेजमेंटला आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले आहेत.

आयरा-नुपूर 2020 पासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी 2021 मध्ये त्यांच्या नात्याची माहिती सर्वांना दिली होती. हे जोडपे अनेकदा एकमेकांसोबत पार्टी करताना आणि बॉलिवूड इव्हेंट्समध्ये एकत्र सहभागी होताना दिसत असतात. आता या जोडप्याच्या एंगेजमेंटनंतर लोक त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. (Bollywood)

आयरा खानने तिचा भावी पती नुपूरसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा त्यांच्या एंगेजमेंटच्या दिवशीचा व्हिडिओ आहे. हा व्हिडीओ शेअर करताना आयराने कॅप्शनमध्ये लिहिले की, “अनेक प्रसंगी मला अनेकांनी सांगितले आहे की मी चांगल्या पार्टी देते. मला वाटते की लोक मला खूप श्रेय देतात. माझ्या पार्टीमध्ये आणि इतरांमध्ये मोठा फरक म्हणजे पाहुण्यांची यादी. आपल्या आयुष्यातील लोकच असे प्रसंग आनंदी आणि मजेदार बनवतात. एंगेजमेंटला उपस्थित राहिल्याबद्दल आयराने तिच्या खास पाहुण्यांचे आभार मानले. (Video)

आमिर खानच्या एक्स पत्नी किरण राव आणि रीना दत्ता या दोघीही आयराच्या एंगेजमेंट पार्टीत सहभागी झाल्या होत्या. याशिवाय आमिर खानचा भाचा अभिनेता इम्रान खान, फातिमा सना शेख आणि आशुतोष गोवारीकर यांसारखे अनेक स्टार्स या कार्यक्रमाला हजार होते. या सर्वांनी मिळून आयराची एंगेजमेंट पार्टी एक्स्ट्रा स्पेशल बनवली. (Aamir Khan)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजितदादांचा पुणेकरांसाठी मोठा वादा, देवेंद्र फडणीस म्हणाले - 'घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं'

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ? वाचा

Ukadiche Modak Recipe : सारण भरल्यावर उकडीचे मोदक फुटतात? मग 'ही' रेसिपी एकदा फॉलो कराच

SCROLL FOR NEXT