Aamir Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aamir Khan : आमिर खानला मोठा धक्का; नेटफ्लिक्सने रद्द केली ‘लाल सिंग चड्ढा’ची डील

आमिर खानचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याला आणखी एक मोठा धक्का बसलाय. नेटफ्लिक्सने लाल सिंग चड्डा चित्रपटाची डील रद्द केली आहे. एकीकडे सोशल मीडियावर आमिरच्या चित्रपटाला विरोध होत असतानाच आता नेटफ्लिक्सने देखील या चित्रपटाचे हक्क खरेदी करण्यास नकार दिला आहे. आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटाकडून निर्मात्यांना खूप अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपट फारशी कमाई करू न शकल्याने आमिर खानचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. (Amir Khan Lal Singh Chaddha News)

लाल सिंग चड्डा या सिनेमातून तब्बल ६ वर्षांनी आमिर खान मोठ्या पडद्यावर परतला होता. आमिरचा लालसिंग चड्डा हा चित्रपट हॉलिवूड फिल्म ‘फॉरेस्ट गंप’चा रिमेक आहे. आमिर खान या चित्रपटात एका शिखाच्या भूमिकेत आहे. मानसिक दृष्टया फिट नसलेल्या व्यक्तीचा रोल आमिरने निभावला आहे. आमिरच्या या चित्रपटावरून बराच वाद झाला. या चित्रपटात शिखांचा अपमान झाल्याचा आरोप अनेकांनी केला.

इतकंच नाही तर चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी केली. दरम्यान, या चित्रपटाचे अधिकार घ्यायला आमिरला तब्बल १० वर्ष लागली होती. मात्र, इतकं करूनही चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मोहिम सुरू झाली. त्यामुळे ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शित होऊनही, विकेंडमध्ये चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळाला. विशेष बाब म्हणजे चार पाच दिवसांची सुट्टी असून सुद्धा प्रेक्षकांनी चित्रपटाला म्हणावं तसा प्रतिसाद दिला नाही. मागील काही वर्षाचं गणित बघता आमिरच्या चित्रपटाला मिळालेला हा सर्वात कमी प्रतिसाद आहे.

नेटफ्लिक्सने का केली डील रद्द?

नेटफ्लिक्सने आमिर खानसोबतचा करार रद्द करण्याचं कारणही समोर आलं आहे. आमिरला खान आणि वायकॉमला ‘लाल सिंह चड्ढा’च्या डिजिटल अधिकारांसाठी सुमारे 200 कोटी रुपये हवे होते. यासोबतच आमिर खानने नेटफ्लिक्सकडे थिएटर आणि ओटीटी रिलीजमध्ये तीन महिन्यांचं अंतर ठेवण्याची मागणीही केली होती. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फारशी कामगिरी न केल्याने नेटफ्लिक्सला आता या चित्रपटात रस राहिलेला नाही आणि यामुळेच त्यांनी हा करार रद्द केल्याचं कळतंय.

आमिर खान डिप्रेशनमध्ये?

‘लाल सिंह चड्ढा’ ला अतिशय थंड प्रतिसाद मिळाल्याने आमिरला जबर धक्का बसला. यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला आहे, तो कुणाचेही फोन उचलत नाहीये. अशी माहिती त्यांच्या जवळच्या मित्राने दिली. तब्बल ६ वर्षांनी आमिरची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे अधिकार घ्यायला आमिरला तब्बल १० वर्ष लागली. मात्र, इतकं करूनही चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मोहिम सुरू झाली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

SCROLL FOR NEXT