Marathi Serial Off Air AI PHOTO
मनोरंजन बातम्या

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मराठी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अवघ्या ४ महिन्यात गाशा गुंडाळणार

Star Pravah Serial Off Air : स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका अवघ्या ४ महिन्यांत प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमुळे चर्चा रंगली आहे.

Shreya Maskar

लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

अवघ्या ४ महिन्यांत मालिका संपणार

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय मालिका गेल्याकाही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरची मालिका संपणार असल्याची माहिती देणारी एक पोस्ट सोशल मिडिया प्रचंड व्हायरल होत आहे. या वर्षात स्टार प्रवाह वाहिनीवर अनेक नवीन मालिका सुरू झाल्या आणि अनेक जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता 'आमच्या लाडक्या नाईकबाई' मालिका संपणार असल्याची चर्चा रंगली आहे.

व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?

व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये असे पाहायला मिळत आहे की, ऐश्वर्या नारकर मुख्य भूमिकेत असलेली मालिका 'आमच्या लाडक्या नाईकबाई' संपणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच मालिकेचा शेवटचा भाग २१ नोव्हेंबरला प्रसारित केला जाणार आहे. या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे, कारण प्रेक्षक ऐश्वर्या नारकर यांना छोट्या पडद्यावर पाहायला पसंत करतात. मात्र अद्याप स्टार प्रवाह वाहिनीकडून कोणताही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

'आमच्या लाडक्या नाईकबाई' कधी सुरू झाली?

'आमच्या लाडक्या नाईकबाई' ही मालिका १० ऑगस्ट २०२६ रोजी ऑन एअर झाली होती. सुरुवातीला ही मालिका संध्याकाळी ६.३० ला प्रसारित व्हायची. मात्र त्यानंतर मालिकेची वेळ बदलून दुपारी १.०० करण्यात आली. 'आमच्या लाडक्या नाईकबाई' या मालिकेचे १०० भागही पूर्ण झालेले नाहीत आणि त्याआधीच मालिका संपणार आहे. मालिका संपणार म्हणून चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

'आमच्या लाडक्या नाईक बाई' ही कौटुंबिक आणि भावनिक विषयावर आधारित मराठी मालिका आहे. मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी शारदा नाईक यांची भूमिका साकारली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची आवडती शिक्षिका असलेल्या शारदा नाईक यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय प्रेरणादायी आहे.त्या विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच देत नाहीत, तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि चांगले संस्कार रुजवण्याचाही प्रयत्न करतात. मात्र, शाळेतील आदराचे आणि प्रेमाचे स्थान असलेल्या नाईक बाईंच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी आहेत. घरामध्ये त्यांना मानसिक त्रास आणि संघर्षाचा सामना करावा लागतो. त्यामुळे बाहेरून आनंदी आणि आत्मविश्वासू दिसणाऱ्या शारदा यांच्या आयुष्यातील वेदना मालिकेतून उलगडत जातात. या मालिकेत अभिनेत्री अमृता धोंगडे हिने लाडबाईंनी भूमिका साकारली आहे. ती गोड बोलून लोकांचा विश्वास संपादन करते; मात्र तिच्या प्रत्येक कृतीमागे वेगळा हेतू असतो. आपल्या चलाख डावपेचांनी लोकांना अडचणीत आणते. त्यामुळे नाईक बाईंच्या आयुष्यात नवी आव्हाने निर्माण होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लालबाग परळ परिसरामध्ये असलेल्या पूनम पार्क इमारतीमध्ये आग लागल्याची घटना

Pune : तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले, निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा मृत्यू

Winter Breathing Problem : हिवाळ्यात श्वास घेण्यास त्रास होतोय? करा 'हे' ३ घरगुती उपाय, मिनिटांत मिळेल आराम

Maharashtra Wage Rules : कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! सुट्टीच्या दिवशी काम केल्यास मिळणार डबल पगार

Jasprit Bumrah bowling: बुमराहच्या 'मास्टरक्लास' चेंडूवर टॉम लॅथम चक्रावला, बॉल सोडला अन् थेट क्लिन बोल्ड, पाहा Video

SCROLL FOR NEXT