असला नवरा नको गं बाई हे दूरच, महिला म्हणतात लग्नच नको; जाणून घ्या धक्कादायक आणि रंजक कारणं

Manasvi Choudhary

लग्न

आजच्या बदलत्या काळात लग्नाविषयीच्या संकल्पनेत मोठा बदल झाला आहे. पूर्वी एका विशिष्ट वयात लग्न करणे महत्वाचे असायचे.

Marriage

लग्नाला नकार

परंतु आजकाल लग्नाला नकार देण्याचे किंवा अविवाहित राहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे, लग्न न करण्याच्या या निर्णयात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अधिक आहे.

Marriage Tips | Canva

लग्नाला नकार देण्याची कारणे काय?

अनेक सुशिक्षित, नोकरदार आणि स्वावलंबी महिला लग्नाला नकार का देत आहेत? यामागील मुख्य कारणे नेमकी काय आहेत ती या वेेबस्टोरीतून जाणून घ्या.

Marriage Tips | google

करिअरची स्वप्ने (Financial Independence)

पूर्वी महिला आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा सुरक्षेसाठी लग्नावर अवलंबून असत. मात्र, आजच्या महिला उच्चशिक्षित असून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. स्वतःचे करिअर, आर्थिक स्थैर्य आणि स्वावलंबन मिळवल्यानंतर त्या घाईघाईत लग्नाचा निर्णय न घेता स्वतःच्या ध्येयांना प्राधान्य देत आहेत.

Women

लग्नानंतरची जबाबदारी आणि कामाचा व्याप (Double Burden of Work)

लग्नानंतर नोकरी/व्यवसाय सांभाळून घरचे काम, स्वयंपाक, स्वच्छता, मुलांचे संगोपन आणि सासरच्या मंडळींच्या अपेक्षा पूर्ण करणे या सर्व गोष्टींची मुख्य जबाबदारी आजही महिलांवरच येते. या दोन्हीं जबाबदारीची आणि मानसिक थकव्याची भीती त्यांच्या मनात असते.

Women

वैयक्तिक स्वातंत्र्य

महिलांना स्वतःचे स्वातंत्र्य, छंद, मित्रांसोबतचा वेळ महत्वाचा वाटतो. लग्नानंतर अनेकदा कौटुंबिक बंधनांमुळे वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावले जाईल किंवा स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवाव्या लागतील, अशी भीती त्यांच्या मनात असते

.

womens | yandex

जबाबदाऱ्यांची मानसिक तयारी नसणे

लग्नानंतर काही वर्षांतच मुलांचा सांभाळ करणे, त्यांच्या शिक्षणाची आणि भविष्याची जबाबदारी घेणे यासाठी अनेक महिलांची मानसिक किंवा शारीरिक तयारी नसते.

parenting tips | canva

योग्य आणि समजूतदार जोडीदाराचा अभाव

महिलांना जोडीदाराकडून केवळ आर्थिक सुरक्षितता नको असते, तर भावनिक पाठिंबा विचारांची समानता आणि घरकामात समान सहभाग हवा असतो. जेव्हा असा योग्य आणि समजूतदार जोडीदार मिळत नाही, तेव्हा चुकीचे नाते स्वीकारण्यापेक्षा सिंगल राहणे त्या अधिक योग्य मानतात.

healthy marriage tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: लक्ष्मीपूजनासाठी लागणारे संपूर्ण साहित्य आणि वस्तूंची यादी

Laxmi Poojan Samagri List | Saam Tv
येथे क्लिक करा...