Aakhri Sawal Banned Saam tv
मनोरंजन बातम्या

Aakhri Sawal Banned: संजय दत्तला मोठा धक्का; 'आखिरी सवाल' रिलीज होण्याआधीच चित्रपटावर बंदी

Aakhri Sawal Banned: संजय दत्तच्या ‘आखिरी सवाल’ चित्रपटाला UAE मध्ये रिलीजसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या बदलांना मेकर्सनी नकार दिल्याने चित्रपट चर्चेत आला आहे.

Shruti Vilas Kadam

Aakhri Sawal Banned: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याचा बहुचर्चित ‘आखिरी सवाल’ चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. भारतात रिलीज झाल्यानंतर आता या चित्रपटाला UAE मध्ये मोठा धक्का बसला आहे. UAE सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली असून, त्यामुळे मेकर्सची मोठी अडचण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘आखिरी सवाल’ हा चित्रपट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि त्याच्या 100 वर्षांच्या प्रवासावर आधारित आहे. चित्रपटात काही संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दे मांडण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर UAE सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात अनेक कट्स आणि बदल करण्याची मागणी केली होती. मात्र, मेकर्सनी भारतीय प्रेक्षकांसाठी तयार केलेलं मूळ व्हर्जन प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे UAE मध्ये चित्रपटाच्या रिलीजला परवानगी मिळाली नाही.

हा चित्रपट आधी 8 मे रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, CBFC कडून प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्याने रिलीज पुढे ढकलण्यात आली होती. अखेर चित्रपटाला UA 16+ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर 15 मे रोजी भारतात चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

आखिरी सवाल’मध्ये संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसत असून, त्याच्यासोबत नमाशी चक्रवर्ती, अमित साध, समीरा रेड्डी, नीतू चंद्रा आणि मृणाल कुलकर्णी यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजीत वरंग यांनी केलं आहे.

दरम्यान, UAE मधील अबू धाबी, दुबई, शारजाह, अजमान, फुजैराह आणि रस अल खैमाहसह अनेक भागांमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याआधीही काही हिंदी चित्रपटांना गल्फ देशांमध्ये सेन्सॉरशी संबंधित अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. चित्रपटावर बंदी घालण्यात आल्यानंतर सोशल मीडियावरही चर्चांना उधाण आलं आहे. ‘आखिरी सवाल’ आता बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! ९ वर्षीय मुलीवर चुलत आजोबांकडून लैंगिक अत्याचार

Maharashtra News Live Update: हिंगोलीत डेप्युटी कलेक्टरसोबत वाळू माफियांचा रस्त्यात राडा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹३००० जमा; तुम्हाला आले का? योजनेत तुमचं नाव आहे का? अशा प्रकारे चेक करा स्टेट्स

Manoj Jarange : मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार; अंतरवाली सराटीतून तारीख केली जाहीर

IPL 2026: लखनऊविरूद्धच्या पराभवाने सीएसकेचा खेळ फिस्कटला; चेन्नई कशी पोहोचणार प्लेऑफमध्ये?

SCROLL FOR NEXT