Aai Kuthe Kay Karte Serial Update Instagram
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karte Update: बापाने कमावले म्हणून मुलांनी उधळायचं का ? म्हणत अरुंधतीने ईशा-अनिरुद्धला सुनावलं

Isha-Anish Engagement: ईशाला आपल्या लाडक्या नवरोबाला हिऱ्यांची अंगठी द्यायची आहे, यासाठी ती रुसून बसली आहे.

Pooja Dange

Aai Kuthe Kay Karte Episode Update: स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या कमालीची चर्चेत आहे. नेहमीच टीआरपीमध्ये अव्वल ठरणाऱ्या मालिकेत सध्या ईशाच्या साखरपुड्याची धूम सुरू आहे.

या साखरपुड्याच्या धुममध्ये अरुंधती आणि आशुतोष यांच्या नात्यातील गोडवा आणखीनच वाढत चाललाय. त्यांच्या नात्यातील प्रेम आणि जिव्हाळा पाहून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होत आहे. अशातच साखरपुड्याच्या तयारीसाठी अनिशची आई मुंबईला येणार आहे. त्यात यशाची देखील तब्येत ठीक नसल्याने घरातील सर्व चिंतेत आहेत.

कोणालाच त्यांच्या कामाच्या व्यापामुळे यशाकडे द्यायला वेळ नाही. त्यामुळे तो आपल्या भावना कोणाकडेच शेअर करत नाहीये. यश आपल्या आजारपणामुळे पुरता खचून गेला आहे. यशच्या मनात त्याच्या आयुष्यात सगळ उद्ध्वस्त झाल्याची भावना येत आहे. ईशाच्या मागण्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे, यशला ईशाच्या साखरपुड्यात काहीही मदत करता येत नाही याची त्याला खंत वाटत आहे. (Latest Entertainment News)

ईशाने घरच्यांसमोर तिच्या साखरपुड्यात तिला काय हवंय याची लिस्ट वाढतच आहे. ईशाला आपल्या लाडक्या नवरोबाला हिऱ्यांची अंगठी द्यायची आहे, यासाठी ती रुसून बसली आहे. कधी आईसमोर तर कधी आपल्या आजीसमोर तिच्या बकेटलिस्टचा पाढा वाचत आहे.

गेल्या २ वर्षांपासून अनिरुद्धला नोकरी नसल्यामुळे लेकीचा साखरपुडा थाटामाटात करू शकणार नाही, हे तिला माहीत आहे. आता लाडक्या लेकीच्या आनंदापायी अनिरुद्ध तिला हवे तसे दागिने आणि कपडे घेऊन येणार आहे. मात्र त्यावरून अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्यात वाद होणार आहे.

आजच्या भागात, संजना आणि अरुंधती या दोघीही साखरपुड्यासाठी एवढा खर्च का केला असं प्रश्न अनिरुद्धला विचारणार आहेत. त्यावर आपण स्वतः चैनीत राहायचं आणि मुलांना मन मारून जगायला सांगायचं हे मला पटत नाही असं अनिरुद्ध त्याच स्पष्ट आणि परखड मत सर्वांसमोर मांडणार आहे.

मात्र अरुंधती खर्चाचा विषय नसून गरजेचा आहे असं त्याला म्हणते. त्यावर ईशा आपल्या वडिलांनी जे काही पैसे कमवलेत ते आपल्या मुलांसाठीच कमवलेत असं म्हणते. मात्र यावर अरुंधती बापाने पैसे कमावले म्हणून ते मुलांनी उधळायचे असं होत नाही, असं म्हणत तिला सुनावणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

बाबोsss ! २० हजाराला कोथिंबीर जुडी, ४१ हजाराला एक नारळ, पाहा VIDEO

Gautami Patil New Song: सबसे कातील गौतमी पाटीलचं “राणी एक नंबर” गाणं प्रदर्शित

SCROLL FOR NEXT