Kangana Ranaut On The Kerala Story: कंगना रनौतची 'द केरळ स्टोरी' चित्रपटाच्या वादात उडी; ISIS केली जहरी टीका

Kangana Ranaut Slam People: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने या चित्रपटावर मत व्यक्त केले आहे.
Kangana Ranaut Comment On The Kerala Story
Kangana Ranaut Comment On The Kerala Story- Saam Tv
Published On

Kangana Ranaut Comment On The Kerala Story: गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या चित्रपटामुळे बराच वाद सुरू आहे. चित्रपटाच्या कथेवरून सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. काल केरळ उच्च न्यायालयाने चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने या चित्रपटावर मत व्यक्त केले आहे.

बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रनौत नेहमीच वाद अडवून घेत असते. समाजात घडत असणाऱ्या अनेक मुद्द्यांवर ती तिचं मत ठामपणे मांडत असते. ट्वीटरच्या माध्यमातून अनेकांचा ती समाचार देखील घेते. अशातच पुन्हा एकदा कंगनाचं ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबद्दलचं मत चर्चेत आले आहे. (Latest Entertainment News)

Kangana Ranaut Comment On The Kerala Story
Kartik Aaryan Emotional Post: हसऱ्या चेहऱ्यामागचे दुःख..! कॅन्सरच्या काळात आईच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा कार्तिक झाला भावुक

एबीपी माझा महाकट्टा या कार्यक्रमाला काल कंगानाने देखील हजेरी लावली होती. यावेळी तिने या चित्रपटाबद्दल आपले मत मांडले. कंगना म्हणते, “मी हा चित्रपट पाहिलेला नाही, पण चित्रपटावर बंदी घालण्यासाठी देशात अनेक प्रयत्न होत आहेत.

मी आज फक्त वाचलं, चूक असेल तर दुरुस्त करा, चित्रपटावर बंदी घालता येणार नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे. मला वाटते की या चित्रपटात ISIS शिवाय इतर कोणालाही चुकीचे उद्देशत नाही ना? देशातील सर्वात जबाबदार संस्था उच्च न्यायालय असे म्हणत असेल तर त्यांचे म्हणणे बरोबर आहे.

ISIS ही दहशतवादी संघटना आहे. त्यांना फक्त मीच नाही तर आपला देश, सरकार आणि मुख्यबाब म्हणजे इतर देशही त्यांना दहशतवादी संघटना म्हणूनच संबोधतात.”

कंगना पुढे म्हणते, 'जर तुम्हाला वाटत असेल की ती दहशतवादी संघटना नाही, तर तुम्हीही दहशतवादी आहात हे उघड आहे. मुख्य बाब म्हणजे, त्या संघटनेला कायदेशीर, नैतिकदृष्ट्या, सर्व प्रकारे दहशतवादी घोषित केले गेले आणि तुम्हाला वाटत असेल की तो दहशतवाद नाही तर चित्रपटापेक्षा तुम्हीच मोठी समस्या आहेत, तुम्ही आधी विचार केला पाहिजे की तुम्ही तुमच्या काही दोष तर नाही ना?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com