कायमच टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानी राहिलेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा चाहतावर्ग फार मोठा आहे. या मालिकेचे आतापर्यंत १००० एपिसोड पूर्ण झाले आहेत. २०१९ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने कुठलाही खंड न पडता प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करत कायमच टीआरपीच्या यादीत मालिकेने आपले स्थान निर्माण केले आहे. मालिकेमध्ये संजनाचे पात्र साकारणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्री रुपाली भोसलेने मालिकेचे १००० एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने, सर्व प्रेक्षकांचे, मालिकेतील सहकलाकारांचे आणि टीममधील इतरांचे आभार मानले आहेत.
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाच्या भूमिकेमुळे रूपाली भोसले कायमच चर्चेत असते. नुकतंच अभिनेत्रीने मालिकेबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणते, “ ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे नुकतेच १ हजार भाग पूर्ण झाले आहेत. एखाद्या प्रोजेक्टला एवढं प्रेम मिळणं ही कलाकारांसाठी खूप मोठी गोष्ट असते. टीम वर्क म्हणजे काय हे खरंच आमच्या मालिकेचे निर्माते राजन शाही यांच्याकडून कळालं. ‘प्रोडक्शन हाऊस’ हा शब्द जेव्हा आपण म्हणतो, त्या ‘हाऊस’ शब्दाचा खरा अर्थ आमच्या मालिकेच्या प्रोडक्शनला बरोबर कळाला आहे. या मालिकेचा मी एक भाग आहे याचा खरंच खूप जास्त अभिमान वाटतोय.” (Serial)
रुपाली भोसले पुढे लिहिते, “नमिता वर्तक या माझ्या मैत्रिणीचे मला संजना पात्र दिल्याबद्दल खूप खूप आभार… तुला दिलेला शब्द मला आजही लक्षात आहे. मी संजना कायम त्याच प्रेमाने आणि प्रामाणिकपणे लोकांसमोर सादर करेल. तू माझ्यावर ठेवलेला विश्वास हाच माझा खूप मोठा आधार आहे.” (Actress)
“आज १ हजार भाग पूर्ण होऊनही आमची टीम पहिल्या दिवसासारखं काम करत आहे. म्हणूनच प्रेक्षकांना ही मालिका आपलीशी वाटते. रवी करमरकर यांचा नेहमी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो. ही गोष्ट खरंच कमाल आहे. तो या मालिकेचा कॅप्टन ऑफ शिप आहे. सुबोध भरे तुझ्याबद्दल मी काय बोलू? आज संजना तुझ्यामुळे लोकप्रिय आहे. पण संजना मोठी झाली यामध्ये तुझे खूप श्रेय आहे. आज सुद्धा तू पहिल्या दिवशी जसं शुट केलं तसंच करतोय. तू सेटवर आलास की खरच खूर मज्जा येते. जास्त शूट सुद्धा तू खूप सहज रित्या करून घेतो. आमच्या मालिकेचा तू छोटा मस्तीखोर बाळ आहेस.” (Marathi Film)
पोस्टच्या शेवटच्या भागात अभिनेत्री म्हणते, “तुषार विचारेमुळे आज लोकांना मालिका ऐकावीशी वाटते. प्रत्येक वाक्य, भावना यावर तू काम करतो. तुझ्यामध्ये थोडा वैष्णव आहे, जो मध्ये मध्ये बाहेर येतो. सेटवरील वातावरण तू नेहमीच खूप खेळकर आणि तितकंच प्रोफेशनल ठेवतो. बऱ्याचदा तू एकटा संपूर्ण डोलारा सांभाळतोस, पण कुठेच काही कमी पडत नाहीस. या सगळ्यांसह संपूर्ण टीम, सहकलाकारांचे खूप खूप आभार…१ हजार भाग पूर्ण झाले आता पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम!” (Entertainment News)
डिसेंबर २०१९ पासून मालिकेला सुरूवात झाली असून सुरूवातीच्या काळात मालिकेला खास TRP मिळाला नव्हता. पण लॉकडाऊनच्या काळात या मालिकेने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. लॉकडाऊनपासून मालिकेला सर्वाधिक TRP मिळू लागला. मालिकेला टेलिकास्ट होऊन ४ वर्ष झाली असून ही मालिका TRP च्या शर्यतीत कायमच टॉप ५ मध्ये कायम असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.