Aai Kuthe Kay Karte Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karte : पुन्हा वादळ येणार! अरुंधती-अनिरुद्धनंतर देशमुखांच्या घरात अजून एक नात संपणार

Aai Kuthe Kay Karte News : 'आई कुठे काय करते'मध्ये आता देशमुखांच्या घरात आणखी एक घटस्फोट होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aai Kuthe Kay Karte Promo : 'आई कुठे काय करते' मालिकेत रोज नवीन ड्रामा पाहायला मिळतो. मालिका ही खूप रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. प्रेक्षक रोज न चुकता मालिका पाहतात. मालिकेत आता एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेत संकट काही संपता संपत नाही. एकामागोमाग संकट येताना दिसत आहेत. ईशा-अनिशने पळून जाऊन लग्न केल्यानंतर आता देशमुखांच्या घरात आणखी एक घटस्फोट होणार आहे. (Latest Entertainment News In Marathi)

'आई कुठे काय करते' मालिका सोशल मीडियावरही प्रचंड चर्चेत असते. मालिकेच्या पुढील भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. प्रोमोत सुरवातीला देशमुख घरात सर्वजण एकत्र गप्पा मारताना दिसत आहेत. कांचन विशाखाला विचारते की, 'किती दिवस झाले जावईबापूंचे दर्शन झाले नाही'. यावर ईशा म्हणते की, 'माझ्या लग्नात अविनाश काका येऊ शकत नाही हे मी समजू शकते. पण लग्नात केदार काका हवाय मला माझ्या लग्नात'.

यावर लगेचच यश उठून विशाखाला म्हणतो, 'जर केदार काका आला नाही तर लग्न कॅन्सल म्हणजे कॅन्सल!' यावर विशाखा मोठ्याने ओरडते आणि म्हणते, 'केदार येणार नाही म्हणजे नाही'. यापुढे अरुंधती आणि विशाखामध्ये बेडरुममध्ये संवाद होताना दाखवला आहे. अरुंधती विशाखाला विचारते, 'विशाखा मला सांगणारेस का नक्की काय झालंय ते?' .

यावर विशाखा रडत म्हणते की, 'अरु केदारने माझ्याकडे डिव्होर्स मागितला आहे'. विशाखा आणि अरुंधतीचे हे बोलणे आप्पा ऐकतात. आप्पा म्हणतात, 'अग काय बोलतेस विशाखा हे!'.

मालिकेत येत्या काही दिवसांत खूप रंजक घोष्टी घडणार आहे. नुकतच मालिकेत ईशा आणि अनिशने पळन जाऊन लग्न केले आहे. या लग्नाला घरातील सर्वांनी विरोध दर्शवला होता. मात्र, आशुतोषने अरुंधतीला समजवल्यानंतर त्यांनी ईशा-अनिशचे पुन्हा लग्न लावण्याचा निर्णय घेतला आहे. आता आणखी एक संकट समोर आले आहे. या संकटातून देशमुख कुंटुंब कसा मार्ग काढणार हे येत्या काही भागात स्पष्ट होईल.

ईशाचे लग्न कोणताही अडथळा पडता पार पडणार का? विशाखा आणि केदारचा डिव्होर्स होणार का? या सगळ्याचा देशमुख आणि केळकर कुटुंबावर काय परिणाम होणार? हे पाहण रंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक

Shilpa Shetty Photos: लाल साडी अन् सडपातळ कंबर, शिल्पाच्या सौंदर्याने केले घायाळ

Rain : राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने झोडपलं; नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

Heart Attack: सकाळची ही सवय वाढवते हार्ट अटॅकचा धोका; रक्तवाहिन्या का होतात ब्लॉक?

Rajeev Deshmukh : ऐन दिवाळीत राजकीय वर्तुळात शोककळा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिलेदाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

SCROLL FOR NEXT