Ashvini Mahangade Post Instagram
मनोरंजन बातम्या

Ashvini Mahangade Post: अश्विनी महांगडेचे खास फोटोशूट चर्चेत, अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत सांगितली आयुष्यातल्या ‘लाकूडतोड्या’ची गोष्ट

Ashvini Mahangade News: ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेचं सध्या फोटोशूट चर्चेत आलं आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये चाहत्यांसोबत आयुष्यातल्या ‘लाकूडतोड्या’ची गोष्ट सांगितली.

Chetan Bodke

Ashvini Mahangade Shared On Lakudtodyachi Goshta

नेहमीच वैविध्यपुर्ण अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी आश्विनी महांगडे कायमच चर्चेत असते. सध्या आश्विनी महांगडे प्रेक्षकांच्या भेटीला ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान, तिने मालिकेत ‘अनघा’चे पात्र साकारलेय. कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत राहणारी अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर तिचं एक फोटोशूट चर्चेत आलं आहे. तिने आपल्या फोटोशूट शेअर करत एक पोस्ट सुद्धा शेअर केली आहे.

अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये ‘एका लाकूडतोड्याची गोष्ट’ सांगितली आहे. अभिनेत्रीचे हे लाकडाच्या वखारीतील फोटोशूट कमालीचे चर्चेत आले आहे. तिने त्या पोस्टमध्ये तिच्या रियल लाईफमधल्या लाकूडतोड्याची म्हणजेच तिच्या वडीलांची कथा सांगितली आहे. अश्विनी महांगडे आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “ ‘गोष्ट एका लाकूडतोड्याची...’ काही फोटोशूट हे अर्थपूर्ण असतात. हे फोटोशूट मी माझ्या घरी केले. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मागे लाकूड आहे, जळण पडलंय, कसली तरी मशीन आहे आणि हे कसले घर? ”

लाकूडतोड्याची गोष्ट सांगताना अश्विनी पुढे बोलते, “नाना (माझे वडील) यांनी सुरुवातीच्या काळात कामधंदा सुरू करताना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला पण जम बसला नाही. तरीही प्रयत्न मात्र थांबले नाहीत. त्यावेळी कुणाच्या तरी शेतातील सुकलेले झाडं, शेतात बांधावर असलेले बाभळीचे झाड ते विकत घेवु लागले आणि सुरू झाला माझ्या बापमाणसाचा लाकूडतोड्या हा व्यवसाय. अतिशय कष्टाचा हा व्यवसाय. तेव्हा गॅस नव्हते त्यामुळे चुलीसाठी जळण, घर बांधण्यासाठी फळ्या, आणि मयतीसाठी जळण असा त्याचा वापर व्हायचा. या कामात त्यांची साथ माझ्या मम्मीने तर दिलीच पण त्याहीपेक्षा जास्त साथ ही त्यांच्या आईने लक्ष्मीबाईने दिली. रोज वखारित जावून बसायला लागायचे. ते काम आज्जी करायची. १-१ पैशाचा हिशोब रात्री ती नानांना सांगायची.”

पोस्टमध्ये पुढे अभिनेत्री सांगते, “नाना खूप अभिमानाने सांगायचे की मी लाकूडतोड्या आहे आणि मला आपली लोखंडाची कुऱ्हाडच प्रिय. एक उत्तम कलाकार असूनही केवळ आपल्या कुटुंबासाठी, पोटापाण्यासाठी वेगळे क्षेत्र निवडून त्यावर प्रेम केले आणि त्याचा आम्हालाही आदर आहे. मयतीसाठी लागणारे लाकूड ही आपल्यासाठी फार साधी गोष्ट असेल पण त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची. कारण मेलेल्या माणसाला अग्नी दिल्यानंतरच त्याची मुक्ती होते आणि त्यासाठीचे एक महत्त्वाचे काम आपण करतो असे ते समजायचे. आता आम्ही सुद्धा तेच मानतो. कोरोनाच्या काळात कुणीही नातेवाईक साध्या आजाराने जरी कोणाचा मृत्यू झाला तरी खांदा द्यायला तयार नव्हते. त्यावेळी ते कामही नानांवर पडले किंवा त्यांनी ते स्वीकारले. मृतदेह आमच्या पीकअप मधून घेवून जाणे हे एक काम वाढले. नानांनी हे काम करावे अशी माझी इच्छा अजिबात नव्हती..”

पोस्टच्या शेवटच्या भागात अश्विनी सांगते, “कारण यात त्यांना कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. पण त्यांना असे कायम वाटायचे की हे देवाने माझ्यावर जबाबदारीने टाकलेले काम आहे. हे काम त्यांनी शेवटपर्यंत केले आणि यातच त्यांना कारोना झाला. वखार आजही आहे. त्यांच्याशिवाय पण त्यांच्या तत्वांवर हळूहळू अनेक गाड्या आल्या, वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी संधी शोधल्या आणि काम सुरू केले पण आजही एक काम निष्ठेने केले जाते आणि ते म्हणजे मयतीसाठी जळण दिलं जातं. मम्मी म्हणते यात फायदा नाही झाला तरी हे काम बंद नाही करायचे कारण हीच आपली सुरुवात आहे आणि सेवा. महालय/ महाळाचा पंधरवडा सुरू होईल. ४ माणसं घरी येतील, जेवतील. पण गेलेल्या माणसाचे विचार हे महत्त्वाचे आहेत...”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेलची आणि मध एकत्र खाल्ल्यास काय होतं?

Pune News: धक्कादायक! २ वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, पाहा घटनेचा थरारक VIDEO

Home Made Lip Balm: घरच्याघरी दोन मिनिटांत तयार करा लिपबाम, फाटलेले ओठ होतील एकदम सोफ्ट

Post Diwali Skin Care: दिवाळीनंतर वाढत्या प्रदूषणामुळे त्वचेची घ्या अशा प्रकारे काळजी; फॉलो करा या टीप्स

Maharashtra News Live Updates: अजित पवार उद्या नंदुरबार जिल्ह्याचा दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT