sukesh chandrashekhar Saam Tv
मनोरंजन बातम्या

सुकेश चंद्रशेखरने तुरुंगातून लिहिले पत्र; जॅकलिनबाबद केला मोठा खुलासा

सुकेश चंद्रशेखरने आता तुरुंगातून आपल्या वकिलाला पत्र लिहिले आहे. सुकेशने पत्रात जॅकलिन फर्नांडिसबाबत मोठा खुलासा केला आहे.

Shivani Tichkule

मुंबई - २०० कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सुकेश चंद्रशेखर अटकेत आहे. सुकेशसोबतच बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिचे (Jacqueline Fernandez) नाव देखील मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात जोडण्यात आले आहे. सुकेशने आता तुरुंगातून आपल्या वकिलाला एक पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये सुकेशने जॅकलिनबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. (Latest Entertainment News)

सुकेशने त्याच्या वकिलाला लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, जॅकलिन फर्नांडिसची मनी लाँड्रिंग प्रकरणात कोणतीही भूमिका नाही. त्याने पत्रात जॅकलिनला दिलेल्या सर्व महागड्या भेटवस्तू, अभिनेत्रीला दिलेली कार हे फक्त रिलेशनशिपमध्ये असल्याने दिल्याचे सांगितले आहे. रॅनबॅक्सीच्या माजी मालकाच्या सुटकेसाठी आपल्याला 200 कोटी रुपये देण्यात आल्याचा दावाही सुकेशने या पत्रात केला आहे. 

पत्रात जॅकलिन निर्दोष असल्याचे सांगितले

मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीनला अडकवण्यात येत आहे. मी यापूर्वी स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो आणि याच रिलेशनशिप अंतर्गत मी जॅकलीन आणि तिच्या कुटुंबाला भेटवस्तू दिल्या होत्या. जॅकलीनने माझ्याकडून कधीच प्रेम आणि तिच्यासोबत उभे राहण्याशिवाय काहीही मागितले नाही. जॅकलीन आणि तिच्या कुटुंबावर खर्च केलेला प्रत्येक पैसा कायदेशीररित्या कमावला होता आणि तो लवकरच ट्रायल कोर्टात सिद्ध होईल.

'जॅकलिनला जबरदस्तीने ओढले गेले'

या प्रकरणात जॅकलिन आणि तिच्या कुटुंबाला ओढण्याची गरज नव्हती. जॅकलीन आणि तिच्या कुटुंबियांना फसवणूक प्रकरणात बळजबरीने ओढण्यात आल्याचा आरोप सुकेशने केला आहे. सुकेशने असेही म्हटले आहे की तो एक दिवस जॅकलिनला नक्कीच पूर्णपणे निर्दोष सिद्ध करेल. सुकेशने आपल्यावरील फसवणुकीच्या प्रकरणाचे वर्णन राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.

जॅकलिनला कोर्टाकडून दिलासा मिळाला

दिवाळीच्या मुहूर्तावर तिला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. 200 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात जॅकलीनच्या अंतरिम जामीनाला 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जॅकलिन फर्नांडिस 22 ऑक्टोबर रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात न्यायालयात हजर झाली होती. कोर्टाने जॅकलिनच्या जामिनात वाढ केली आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने ईडीला सर्व पक्षकारांचे आरोपपत्र आणि खटल्याशी संबंधित आवश्यक कागदपत्रे देण्याचे आदेश दिले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dnyanda Ramtirthkar: 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्याचं शिक्षण किती?

Maharashtra Live News Update : गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा, ख्रिस्ती बांधवांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

Karachi building collapse : पाकिस्तानात चमत्कार! इमारत कोसळून हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू, पण 'ती' आश्चर्यकारकरित्या बचावली

Shopping For Ladies: प्रत्येक महिलेने स्वतःसाठी खरेदी करायला हव्या 'या' महत्वाची गोष्ट

Maharashtra Politics: अजित पवारांनी बैठक रद्द का केली? कोणता दलाल आडवा आला? – नाना पटोलेंचा विधानसभेत घणाघात| VIDEO

SCROLL FOR NEXT