Akshaya Deodhar and Hardik Joshi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hardik And Akshaya Wedding: पाठकबाई आणि राणादाचे चाहत्यांना अनोखे गिफ्ट; पत्रिका आल्या पण तारीख गुलदस्त्यात

अक्षया आणि हार्दिकची जवळची मैत्रिण असलेल्या अभिनेत्री रुचा आपटेलाही नुकतेच यांच्या लग्नाची पत्रिका मिळाली असून तिने त्याचा सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hardeek Joshi and Akshaya Deodhar's Wedding card: राणादा आणि पाठकबाई ही जोडी जेवढी टेलिव्हिजनवर हिट होती, तेवढीच हीट जोडी ही खऱ्या आयुष्यात होणार आहे. झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून दोघे एकत्र दिसले होते. जेव्हा या दोघांनीही साखरपुड्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

नव जोडप्याला लग्नाआधी करत असलेल्या पारंपारिक केळवणाचा त्यांनी आनंद लुटला आहे. या दोघांनीही जवळचे मित्र आणि कुटुंबासह त्यांच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका वाटप करण्यास सुरुवात केली आहे. अक्षया आणि हार्दिकची जवळची मैत्रिण असलेल्या अभिनेत्री रुचा आपटेलाही नुकतेच यांच्या लग्नाची पत्रिका मिळाली असून तिने त्याचा सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री ऋचा आपटेने ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमध्ये हार्दिकच्या ट्रेनर-मॅनेजरचे पात्र साकारले होते. तेव्हापासून हार्दिक, अक्षया आणि ऋचा यांची चांगली मैत्री आहे. त्यांचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

नुकताच ऋचाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये हार्दिक आणि अक्षया यांची लग्नाची पत्रिका स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. या फोटोला तिने ‘रांझना’ या चित्रपटातील गाणं जोडलं आहे.

Rucha Apte

गेल्या काही काळापासून डेट करत असलेल्या या जोडप्याने अद्याप लग्नाची तारीख उघड केलेली नाही, परंतु हार्दिक आणि अक्षया डिसेंबर 2022 च्या अखेरीस लग्नबंधनात अडकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

SCROLL FOR NEXT