Ranveer singh image  Saam Tv
मनोरंजन बातम्या

न्यूड फोटोशूट करून रणवीर सिंग अडचणीत, 'महिलांच्या भावना दुखावल्याचा' आरोप, तक्रार दाखल

न्यूड फोटोशूटमुळे 'महिलांच्या भावना दुखावल्याबद्दल' रणवीर सिंग विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचे(Ranveer Singh) न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रचंड चर्चा होतं आहे. अनेक सेलिब्रिटी रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याच्या व्हायरल फोटोंना त्याच्या चाहत्यांकडूनही भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. रणवीरचा सोशल मीडियावर एक मिम फेस्ट देखील सुरू झाला आहे. परंतु रणवीर त्याच्या बोल्ड फोटोंमुळे सध्या कायदेशीर अडचणीत सापडला आहे.

अमेरिकन अभिनेता बर्ट रेनॉल्ड्सला(Burt Reynolds) श्रद्धांजली म्हणून रणवीरने त्याच्यासारखे एका मासिकासाठी फोटोशूट केले होते. पण या फोटोशूटमुळे 'महिलांच्या भावना दुखावल्याबद्दल' रणवीर सिंग विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण तक्रारीबाबत संपूर्ण माहिती अद्याप उघड झाली नाही.

रणवीरच्या न्यूड फोटोशूटचे फोटो समोर आल्यापासून रणवीर सिंग वादात सापडला आहे. हे फोटोशूट व्हायरल झाल्यानंतर त्यावरून राजकारणही सुरू झाले आहे. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रमुख अबू आझमी यांनी ट्विट करून रणवीर सिंगच्या या फोटोशूटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, सार्वजनिक ठिकाणी नग्न फोटो काढणे ही 'कला' आणि 'स्वातंत्र्य' आहे, मग हिजाब घालण्यावर 'दबाव' का? त्याचबरोबर अभिनेत्री मिमी चक्रवर्ती हिने रणवीरच्या फोटोंवर प्रतिक्रिया देत, हे फोटोशूट रणवीरऐवजी कोणत्या अभिनेत्रीने केले असते तर काय प्रतिक्रिया आली असती? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

एका मासिकासाठी मुलाखत देताना रणवीर सिंग म्हणाला होता की, 'लोक माझ्या फॅशन आणि कपड्यांबद्दल काय विचार करतात याकडे मी लक्ष देत नाही.त्यांना जे आवडते तेच परिधान करतात, तेच अन्न खातात. त्याचप्रमाणे मी देखील मला जे आवडत तेच मी करतो. इतरांना याचा त्रास झाला तर त्याच्याशी मला काही फरक पडत नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : ठाकरे गटाच्या आमदाराच्या जवळच्या सहकाऱ्याचा धिंगाणा, कारमधून फोडले २८८ फटाके

Shocking : आशियाई खेळात भारताचं नेतृत्व करणाऱ्या खेळाडूने आयुष्य संपवलं, क्रीडा विश्वात खळबळ

भारताविरोधात चीन्यांची नवा डाव? पेंगाँग जवळ चीनचा हवाई तळ?

Shocking : कॉलेजला जाताना अडवलं; भररस्त्यात तरुणीवर तरुणाकडून अॅसिड हल्ला, राजधानीत खळबळ

Vitamins: जास्त व्हिटॅमिन्सही बरं नव्हं! अति सेवनाने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT